EPF Account मध्ये लवकरच जमा होणार 2020-21 च्या व्याजाचे पैसे, तुम्ही ‘या’ पध्दतीनं ‘डाऊनलोड’ करू शकता पीएफ अकाऊंटचं पासबुक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सर्वोच्च निर्णय घेणार्‍या केंद्रीय विश्वस्त मंडळाने (सीबीटी) २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ८.५० टक्के दराने व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. ईपीएफओ लवकरच मागील आर्थिक वर्षाचे व्याज पीएफ खातेधारकांच्या खात्यावर जमा करण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तुम्हीही पीएफ खातेदार असल्यास पीएफ खात्यात व्याज जमा होण्याची आतुरतेने वाट पाहत असाल. अशात तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक कशी तपासू शकता आणि पासबुक कसे डाउनलोड करू शकता ते जाणून घेऊया…

असा चेक करू शकता आपला EPF Balance
एसएमएसद्वारेः जर तुमचा यूएएन नंबर सक्रिय असेल, तर तुम्ही तुमच्या पीएफ खात्यात दिलेल्या योगदानाची आणि बॅलन्सची माहिती ‘७७३८२९९८९९’ वर एसएमएस पाठवून मिळवू शकता. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावरूनच संदेश पाठवल्यास प्रत्युत्तर मिळेल. ही सुविधा हिंदी, इंग्रजी, पंजाबी, गुजराती, मराठीसह १० भाषांमध्ये उपलब्ध आहे

Missed Call च्या माधयमातून
यूएएन पोर्टलवर नोंदणीकृत सदस्यांना मिस कॉलद्वारेही त्यांच्या पीएफ बॅलन्सची माहिती मिळू शकते. यासाठी EPF Subscribers ला त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून ‘०११-२२९०१४०६’ वर मिस कॉल द्यावा लागेल. या नोंदणीकृत नंबरवरून कॉल केल्यावर दोन वेळा रिंग वाजून फोन आपोआप डिस्कनेक्ट होतो. यानंतर तुम्हाला एसएमएसद्वारे पीएफ शिल्लकची माहिती मिळते. ही एक पूर्णपणे विनामूल्य सेवा आहे.

EPF पोर्टलच्या माध्यमातून
तुम्ही ईपीएफओ पोर्टलवरून फक्त पीएफ बॅलन्सच माहित करू शकत नाहीत, तर संपूर्ण स्टेटमेंटचा तपशीलदेखील मिळवू शकता. उदाहरणार्थ या पोर्टलद्वारे तुम्ही ही माहिती मिळवू शकता की, तुमच्या नियोक्ताने तुमच्या खात्यात कधी योगदान पाठवले आणि व्याजची रक्कम तुमच्या खात्यात कधी जमा झाली.

असे डाऊनलोड करू शकता सदस्य पासबुक
सर्वप्रथम https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login वर लॉगिन करा.
आता युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) आणि पासवर्डच्या माध्यमातून या पोर्टलवर लॉगिन करा.
आता तुमच्यासमोर एक पान उघडेल.
या पृष्ठावर सदस्य आयडी निवडा.
आता तुम्ही या पोर्टलवर पासबुक चेक करू शकता आणि दाव्याची स्थिती देखील तपासू शकता.

मात्र तुम्हा सर्वांसाठी हे जाणून घेणे महत्वाचे आहे की, यूएएन सक्रिय असेल तरच तुम्ही या सेवांचा लाभ घेऊ शकता.