Pune : पुणे पोलिस आयुक्तालयातील 13 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पोलिस आयुक्तालयातील 13 पोलिस निरीक्षकांच्या आज (रविवार) अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे आदेश अप्पर आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर यांनी काढले आहेत. बदली झालेल्या अधिकार्‍याचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे –

1. पोनि सुचेता वसंत खोकले (वाहतूक शाखा ते आर्थिक गुन्हे शाखा)
2. पोनि अनिल गंगाधर नलावडे (वाहतूक शाखा ते नियंत्रण कक्ष)
3. पोनि शंकर रामभाऊ डामसे (कोर्ट कंपनी ते वाहतूक शाखा)
4. अनघा विद्याधर देशपांडे (बीडीडीएस ते गुन्हे शाखा)
5. राजेंद्र नारायणराव मोहिते (गुन्हे शाखा ते अतिक्रमण विभाग, पुणे महापालिका)
6. नंदकुमार मुरलीधर बीडवई (वपोनि, सहकारनगर पो.स्टे. ते विशेष शाखा)
7. गणेश जगन्नाथ माने (पोनि, गुन्हे – कोरेगांव पार्क पो.स्टे. ते गुन्हे शाखा)
8. विष्णू नाथा ताम्हाणे (पोनि, गुन्हे – भारती विद्यापीठ पो.स्टे. ते वपोनि, समर्थ पो.स्टे.)
9. मुरलीधर गंगाधर करपे (गुन्हे शाखा ते वपोनि, डेक्कन पो.स्टे.)
10. माया दौलतराव देवरे (पोनि, गुन्हे – चतु:श्रृंगी पो.स्टे. ते विशेष शाखा)
11. मुनाफ फरीद शेख (नियंत्रण कक्ष ते बीडीडीएस)
12. अजित धोंडीराम दळवी (सांगलीवरून हजर ते वाहतूक शाखा)
13. गणेश रंगनाथ उगले (पुणे ग्रामीणवरून हजर ते विशेष शाखा)

शनिवारी करण्यात आलेल्या पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या खालील प्रमाणे –
1. बाळकृष्ण सिताराम कदम (वपोनि, समर्थ पो.स्टे. ते वपोनि. हडपसर पो.स्टे.)
2. अशोक आनंदराव कमद (वपोनि, वारजे माळवाडी – संलग्न नियंत्रण कक्ष ते वपोनि, लष्कर पो.स्टे.)
3. देविदास काशिनाथ घेवारे (वपोनि, दत्तवाडी पो.स्टे. ते वपोनि. सिंहगड रोड पो.स्टे.)
4. नंदकिशोर माधव शेळके (वपोनि., सिंहगड रोड पो.स्टे. ते वाहतूक शाखा)
5. रमेश साहेबराव साठे (वपोनि, हडपसर पो.स्टे. ते विशेष शाखा)

शुक्रवारी करण्यात आलेल्या पोलिस निरीक्षकांच्या बदल्या खालील प्रमाणे –
1. सयाजी गावारे (गुन्हे शाखा ते वपोनि, अलंकार पोलिस स्टेशन)
2. जगन्नाथ कळसकर (फरासखाना पो.स्टे. ते वपोनि, भारतीय विद्यापीठ पो.स्टे)
3. विनायक साळुंखे (विशेष शाखा ते वाहतूक शाखा)
4. जयराम पायगुडे (गुन्हे शाखा ते वाहतूक शाखा)
5. दुर्योधन पवार (विशेष शाखा ते वाहतूक शाखा)
6. सरदार पाटील (विशेष शाखा ते वपोनि, कोंढवा पो.स्टे.)
7. दिपक लगड (वपोनि. डेक्कन – सलग्न, पोलिस आयुक्त यांचे वाचक ते गुन्हे शाखा)
8. विनायक गायकवाड (वपोनि. कोंढवा पो.स्टे. ते गुन्हे शाखा)
9. चंद्रकांत निंबाळकर (आर्थिक गुन्हे शाखा ते कोर्ट आवार)

* पोलिस निरीक्षक दिपक लगड हे पोलिस आयुक्त यांचे वाचक म्हणून पुढील आदेश होईपर्यंत कामकाज पाहतील.

* पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण, नेमणुक गुन्हे शाखा (सध्या संलग्न वपोनि, अलंकार पो.स्टे.) यांना या आदेशाव्दारे त्यांच्या मुळ नेमणुकीच्या ठिकाणी परत करण्यात येत आहे.