हिंगणा येथे जागतिक महिला दिन धडाक्यात साजरा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – हिंगणा येथे महिला दिन धडाक्यात साजरा करण्यात आला. हिंगणा तालुका महिला सेना अध्यक्ष मंजुषाताई गायकवाड यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील महिलांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी मंजुषाताई सचिन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मनसे महिला सेना हिंगणा तर्फे विविध क्षेत्रातील महिलांना शुभेच्छा देण्यात आल्या. हिंगणा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक स्वाती यावले व इतर महिला कर्मचारी यांना सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.

जि. एस. रायसोनी विद्यानिकेतनच्या प्राचार्या जयश्री भाके व इतर शाळेच्या महिला कर्मचारी,  रेडीयंस शाळेच्या प्राचार्य प्राजक्ता ऊमरे, व शाळेच्या महिला कर्मचारी, तसेच हिंगणा तहसील कार्यालयातील महिला कर्मचारी, नगर पंचायत येथील महिला कर्मचारी, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील महिला कर्मचारी, पंचायत समिति हिंगणा कार्यालयातील महिला कर्मचारी, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट व इतर ठिकाणी जाऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी वर्षा बोरकर निलडोह जी.प. अध्यक्षा सविता हिवसे, वानाडोंगरी शहर अध्यक्षा उषा नंदनवार, दिपाली घरडे, मयुरा जोगे, रुपाली तलमले, वैशाली मंडपे, उज्वला भालेराव, व इतर महिला कार्यकर्त्या हजर होत्या.