#Video : रामदेव बाबांनी ‘सीएम’ना शिकवले कंबरेचे व्यायाम ; रांचीत PM मोदी तर मुंबईत सेलिब्रिटींचा ‘योग’बाला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज जगभरात विविध ठिकाणी योगाभ्यासाचे कार्यक्रम पहाटे पासून आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रांची येथील प्रभात तारा मैदानात ४० हजार लोकांसमवेत योगा केला. तर नांदेड येथे सुमारे १ लाख लोकांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना योगगुरु रामदेव बाबा यांनी योगा शिकविला.

मुख्यमंत्र्यांची शरीरयष्टी लक्षात घेऊन रामदेव बाबा यांनी त्यांना भर स्टेजवर कमरेचे व्यायाम आपल्याबरोबर करायला लावले. योगा केल्याने बाबांची कंबरच काय सर्व शरीरच ते म्हणतील तसे वाकते, वळते, पण ते इतरांना करणे शक्य होतेच असे नाही. रामदेव बाबांप्रमाणे कमरेचे व्यायाम करताना मुख्यमंत्रींकडे पाहून उपस्थितांमध्ये हश्शा पिकला.

व्हिडीओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://twitter.com/ANI/status/1141864500301160448

रांची येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, तुमच्या दैनंदिन आयुष्यात योगसाधना अविभाज्य भाग झाला पाहिजे. योग हा सर्वांचा आहे. हवामान बदल हे यंदाच्या योग दिनाचे सूत्र आहे. समाजातील गरिबांपर्यंत योगा पोहचला तर ते आजारापासून वाचू शकतील. निरोगी आरोग्यासाठी केवळ औषधे व शस्त्रक्रिया पुरेशा नाहीत. त्यामुळे आमचे सरकार योगाभ्यासाच्या माध्यमातून लोकांचे आरोग्य कसे सुधारता येईल, यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. योगाचं पालन संपूर्ण जीवनभर केलं पाहिजे. योग कधीही वय, रंग, जात-पात, धर्म-पंत, श्रीमंत-गरीब, प्रांत-देश असा भेदभाव करत नाही. योग सर्वांचा आहे आणि सर्व जण योगाचे आहेत.

गेटवे ऑफ इंडियावर शिल्पा शेट्टीचे धडे

गेटवे ऑफ इंडियावर आज पहाटेपासूनच लोकांची गर्दी झाली होती. योगाला आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रियता मिळवून देणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने येथे लोकांना योगाभ्यासाचे धडे दिले.

सियाचीनपासून विराटपर्यंत योगाभ्यास

भारतीय सैनिकाच्या तुकडीने सियाचीन भागात बर्फात योगाची प्रात्याक्षिके सादर केली तर, विराट युद्ध नौकेवर जवानांनी डेकवर योगाभ्यास केला. अरुणाचल प्रदेशातील लोहितपूर येथे इंडो तिबेटीयन बॉर्डरच्या पथकाने नदीच्या पाण्यात उभे राहून योगा केला.

पुण्यातील बालेवाडी येथे झालेल्या योग प्रात्यक्षिकात महापालिका आयुक्त सौरभ राव, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया सहभागी झाले होते.

आरोग्यविषयक वृत्त –

ह्रदयाची घ्या अशी काळजी , कधीही होणार नाहीत ब्लॉकेजेस …! 

गर्भधारने दरम्यान महिलांनी घ्या व्यायामाची अशी ” काळजी ” 

आजपासून योगा करण्याचा संकल्प करणार असाल तर ‘या’ आसनांपासून करा सुरुवात 

मधुमेह, मानसिक आजार आणि हृद्यरोगाला दूर ठेवण्यासाठी करा हे “प्राणायम”