कामाची गोष्ट : आता केवळ 30 मिनिटांत तुमच्या घरी पोहोचेल LPG ‘सिलिंडर’, 1 फेब्रुवारीपासून सुरू होतेय ‘ही’ सुविधा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंग (LPG gas cylinder booking) नंतर आता आपल्याला 2-4 दिवस प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही. सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल (IOC) ने एलपीजी तत्काल सेवा (Tatkal LPG Seva) सुरू करण्याची योजना आखली असून त्याद्वारे आपल्या घरात गॅस सिलिंडर अवघ्या अर्ध्या तासात पोहोचेल. म्हणजेच ज्या दिवशी आपण सिलिंडर बुक कराल त्याच दिवशी आपल्याला सिलिंडर मिळेल. आयओसी (IOC) प्रारंभी प्रत्येक राज्यातल्या एका शहरात ही सेवा सुरू करेल. येथे त्वरित एलपीजी (LPG) सेवा सुरू होईल.

30 ते 45 मिनिटांत आपल्या घरी पोहोचेल सिलिंडर
Business Standard च्या वृत्तानुसार, आयओसी प्रत्येक राज्यातील एक शहर किंवा जिल्हा निवडेल आणि तेथेच ही सेवा प्रथम सुरू करेल. या सेवेद्वारे कंपनी 30 ते 45 मिनिटांत आपल्या ग्राहकांना सिलिंडर वितरीत करेल. यावर अद्याप काम सुरू असल्याचे सरकारी तेल कंपनीने सांगितले. लवकरच या सेवेला अंतिम स्वरूप देऊन सुरू केले जाणार आहे.

1 फेब्रुवारीपासून ही सेवा सुरू होईल
आयओसीने सांगितले की कंपनीचा हा उपक्रम आम्हाला आमच्या प्रतिस्पर्ध्यांपासून वेगळी ओळख देईल. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ही सेवा 1 फेब्रुवारीपासून सुरू केली जाऊ शकते. ही सेवा लवकरात लवकर सुरू करता येईल या प्रयत्नात सर्व लोक गुंतलेले आहेत.

आयओसीचे जवळपास 14 कोटी ग्राहक आहेत
आयओसी आपल्या ग्राहकांना इंडेन ब्रँड अंतर्गत सिलिंडर प्रदान करते. सध्या देशात 28 कोटी एलपीजी ग्राहक आहेत, त्यापैकी 14 कोटी ग्राहक इंडेन गॅस वापरतात.

या सेवेसाठी किती शुल्क आकारले जाईल ते जाणून घ्या
आयओसीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, तत्काळ एलपीजी सेवे (Tatkal LPG) चा किंवा ‘सिंगल डे डिलीव्हरी सर्व्हिस’ (single day delivery service) चा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना काही किंमत मोजावी लागेल. हे शुल्क किती असेल यावर सध्या चर्चा सुरू आहे. लवकरच याबाबत ग्राहकांना माहिती दिली जाईल.

एसबीसी (SBC) ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे
अधिक माहिती म्हणजे ज्या ग्राहकांकडे एकच सिलिंडर आहे म्हणजेच सिंगल बॉटल सिलेंडर (Single bottle cylinder) आहे त्या ग्राहकांना गॅस संपल्यावर खूप त्रास सहन करावा लागतो. त्याच वेळी, दुहेरी बॉटल ग्राहकांबद्दल (double bottle consumers) बघितले तर त्यांच्याकडे पर्याय असतो, ज्यामुळे त्यांना कोणतीही अडचण येत नाही.