काय सांगता ! होय, सराव थांबवून धोनीनं चेन्नई सोडलं, नव्या लुकचा Video ‘भन्नाट’ (व्हिडीओ)

चेन्नई : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे देशातील अनेक क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर काही स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोना व्हारसमुळे आयपीएल स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने सराव थांबवून चेन्नई सोडण्याचा निर्णय घेतला. चेन्नई सोडताना धोनीने चाहत्यांची भेट घेतील. या घटनेचा व्हिडिओ चेन्नई संघाने शेअर केला आहे. व्हिडिओत धोनी नव्या लुकमध्ये दिसत आहे.


महेंद्र सिंह धोनी हा आपल्या शांत स्वभामुळे ओळखला जातो. तसेच त्याच्या वेगवेगळ्या लुकची चर्चा देखील होत असते. मागील अनेक दिवसांपासून धोनी क्रिकेटपासून दूर राहिला होता. मात्र, आयपीएलच्या निमित्ताने तो पुन्हा एकदा मैदानावर उतरल्याचे पहायला मिळाले. धोनी चेन्नईत गेल्या काही दिवसांपासून आयपीएलसाठी सराव करत आहे. पण बीसीसआयने कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा पुढे ढकलली आहे.
आयपीएलचा निर्णय अद्याप न झाल्याने चेन्नई संघाने आपला सराव थांबवला आहे. तसेच धोनीने देखील चेन्नई सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

चेन्नई सोडण्यापूर्वी धोनीने त्यांच्या चाहत्यांची भेट घेतली. एका चाहत्याने धोनीला चेन्नई तुमचेच घर आहे सर, असे सांगितले. त्यावर धोनीने हसत होकार दिला आणि पुन्हा येणार असल्याचे सांगितले. या व्हिडिओत धोनी नव्या लुकमध्ये दिसत आहे. धोनीने फ्रेंच कट ठेवला आहे.

धोनीच्या या नव्या लुकचा व्हिडिडो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चेन्नई सोडण्याआधी आपल्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांना भेट घेण्यास तो विसरला नाही. त्याने चाहत्यांसोबत फोटो सेशन देखील केले. तसेच काहींना स्वाक्षरी देखील दिली. धोनीच्या भेटीमुळे चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.