धोनीची रिअ‍ॅक्शन पाहून अंपायर थांबला, निर्णयावरून घेतला यू-टर्न, CSK ला बॅन करण्याची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महेंद्रसिंग धोनी विकेटच्या समोरुन उंच उंच शॉट्स मारत असतो, पण जेव्हा तो विकेटच्या मागे असतो तेव्हादेखील 22 गजच्या क्षेत्रातील प्रत्येक हालचालीवर त्याचा डोळा असतो. कधीकधी समोर उभे असलेले अंपायर जे पाहू शकत नाही ते धोनीला विकेटच्या मागच्या बाजुने जाणवते. क्रिकेटमध्ये धोनीने डीआरएसच्या माध्यमातून अंपायरच्या निर्णयाला किती वेळा आव्हान दिले होते, त्यापैकी बहुतेक निकाल त्याच्या बाजूने होते. हेच कारण आहे की, जेव्हा हे प्रकरण धोनी किंवा त्याच्या संघाशी संबंधित असेल तेव्हा अंपयारला देखील सखोल विचार करण्याची किंवा निर्णय बदलण्याची गरज पडते. असेच काहीसे दुबईच्या सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सीएसके सामन्यातही एक रोचक घटना पाहायला मिळाली.

अंपायरने धोनीच्या इशाऱ्यावर बदलला निर्णय !
ही घटना सनरायझर्स डावातील 19 व्या ओव्हरची आहे. शार्दुल ठाकूर गोलंदाजीवर होता. पहिल्याच चेंडूवर 2 धावा दिल्यानंतर त्याने ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूत वाइड केला, त्यानंतर शार्दुलने पुन्हा चेंडू टाकला. यावेळी चेंडू पूर्ण यॉर्कर होता जो ऑफ साइडच्या शेवटी पडला होता. फील्ड अंपायर पॉल रिफेल यालाही वाइड देण्यासाठी हात वर करणार होते, परंतु शार्दुल या निर्णयाला विरोध करीत होता. हे पाहून धोनीनेही या प्रकरणात उडी घेतली. धोनीने विकेटच्या मागे उभे असताना पॉल रिफेलला काहीतरी सांगितले, त्यानंतर अपंयारला आपला निर्णय बदलण्यास भाग पाडले. हे पाहून डगआऊटमध्ये बसलेला एसआरएचचा कॅप्टन डेव्हिड वॉर्नर उठला आणि त्याच्या सीटवरुन उभा राहिला.

सोशल मीडियावर सीएसकेच्या विरोधात लहर
अगदी रीप्लेमध्ये हे स्पष्ट दिसून आले की, चेंडू ऑफ साइडच्या अगदी शेवटी पडला होता. धोनीने तर अंपायर रिफेलला हा निर्णय बदलण्यास भाग पाडलं पण त्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा सीएसकेवर बंदी घालण्याची मागणी वाढली.

https://twitter.com/Viratismylife/status/1316072563194306560?

आता आयपीएल 2020 मध्ये धोनी आणि त्याच्या संघासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. कारण पहिल्या 7 सामन्यांपैकी ते फक्त 2 जिंकू शकले आणि हैदराबादला दुबईमध्ये 20 धावांनी पराभूत केल्यानंतर त्यांनी स्पर्धेतील तिसर्‍या विजयाची स्क्रिप्ट लिहिली. हा सामना जिंकण्यासाठी धोनीने आयपीएल 2020 मध्ये प्रथमच टॉस जिंकल्यानंतर फलंदाजीची निवड केली. इतकेच नव्हे तर विजयाच्या जोरावर धोनीने आणखी एक बाजी मारली आणि फलंदाजीमध्ये बदल केले. शेन वॉटसनच्या जागी त्याने सॅम करनसोबत ओपनिंगसाठी ड्युप्लेसीला उतारवले. धोनीचा अचानक हा निर्णय किती प्रभावी ठरला याचे सर्वात अचूक उदाहरण म्हणजे चेन्नईने सामना जिंकला ज्याची त्याला नितांत आवश्यकता होती.