IPL 2023 | पंजाब किंग्सचा मोठा निर्णय मयंक अग्रवालला कर्णधारपदावरून हटवलं, ‘या’ खेळाडूची केली कर्णधारपदी निवड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – IPL 2023 काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आता प्रत्येक संघ टीम बांधणीला सुरुवात करत आहेत. यादरम्यान काही संघात तुम्हाला बदल पहायला मिळतील. आयपीएलमधील (IPL 2023) पंजाबच्या (Panjab Kings) टीममधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पंजाबने आपल्या टीमचा कर्णधार मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) याला कर्णधार पदावरून हटवले आहे. त्याच्या जागी टीम इंडियाचा महत्त्वाचा फलंदाज शिखर धवनची (Shikhar Dhawan) कर्णधारपदी निवड केली आहे. शिखर धवनने आतापर्यंत आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे.

पंजाब किंग्जने आपल्या ऑफिशियल अकाऊंटवरून हि माहिती दिली आहे. गेल्यावर्षी शिखर धवन पंजाब किंग्ज या टीममध्ये सामील झाला होता.
मागच्या सीझनमध्ये पंजाब टीमची काही विशेष कामगिरी करू शकली नव्हती. त्यामुळे यंदा टीमची सगळी सुत्र यावर्षी शिखर धवनकडे देण्यात आली आहेत.

गेल्यावर्षी मयांक अग्रवाल चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता. त्याला त्या सीझनमध्ये कर्णधारपदाला साजेशी अशी खेळी करता आली नव्हती.
तसेच धवनने गेल्यावर्षी चांगली कामगिरी केली त्यामळे त्याला यंदाच्या सीझनमध्ये कर्णधार बनवण्यात आले आहे.

 

Web Title :- IPL 2023 | ipl 2023 punjab kings big decision mayank agarwal removed from captaincy now he got the command

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | व्याजाच्या पैशांची वसुलीसाठी फ्लॅट खाली करण्याची धमकी, पती-पत्नीला गुन्हे शाखेकडून अटक

Jayant Patil | तरुणांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात शिंदे सरकारला पूर्णपणे अपयश आले- जयंत पाटील

Maharashtra Revenue And Forest Department Officers Transfer | अपर जिल्हाधिकारी संवर्गातील 8 अधिकार्‍यांच्या प्रतिनियुक्तीने नियुक्त्या