IPL 2024 | मुंबई इंडियन्सचा कॅप्टन जाहीर, रोहित शर्मा की हार्दिक पंड्या जाणून घ्या

नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) आयपीएल २०२४ साठी (IPL 2024) कॅप्टन कोण होणार, रोहित शर्मा (Rohit Sharma) की हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मुंबई इंडियन्सने आज एक पत्रक जाहीर केले असून यामध्ये हार्दिक पंड्या हा मुंबईचा कर्णधार असेल, असे स्पष्ट केले आहे. (IPL 2024)

मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा संघात स्थान दिले होते. पण रोहित शर्मा हाच मुंबईचा कर्णधार असणार, असे सर्वांना वाटत असताना मुंबई इंडियन्सने कर्णधार जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला आहे. आता हार्दिक पंड्या हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार असणार आहे. आता हार्दिक मुंबईला जेतेपद जिंकवून देणार का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. (IPL 2024)

सध्या हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त असून काही महिने त्याला खेळता येणार नाही. तरीही मुंबई इंडियन्सने हार्दिकची कर्णधारपदी निवड करत आश्चर्यचकीत केले आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला मागील काही वर्षांत जेतेपद मिळवण्यात अपयश आले आहे. महत्वाचे म्हणजे हार्दिक हा भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार असल्याने त्याला हे कर्णधारपद मिळाल्याची शक्यता आहे.

जखमी असलेला हार्दिक मैदानात कधी परतणार हे अद्याप स्पष्ट नाही.
पण तो आयपीएलमध्ये नक्कीच खेळणार असून मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

धक्कादायक! पत्नी WhatsApp वर चॅटिंग करते म्हणून गळफास देऊन जीवे मारण्याचा केला प्रयत्न, औंध मिलिटरी कॅम्पमधील प्रकार

Manoj Jarange Patil | ”फडणवीस त्यांना बोलायला लावतात, म्हणून ते बोलतात”, नितेश राणेंच्या टीकेवर जरांगेंचे प्रत्युत्तर, सरकारला दिला इशारा

Pune Police MCOCA Action | फटाके फोडण्यावरुन तरुणावर कोयत्याने वार करणाऱ्या फहीम खान टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 98 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

NEMS School Pune | युद्धकला आणि शिवकालीन मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकानी रंगला एन.ई.एम.एस. शाळेचा वार्षिक क्रीडा दिन 850 विद्यार्थांनी घेतला सहभाग

Shivsena Thackeray Group | ठाकरे गटाच्या बडगुजरांना कथित ‘कुत्ता पार्टी’ भोवणार, गृहमंत्र्यांकडून एसआयटी चौकशीची घोषणा