IPS Amitabh Gupta | अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांची ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

मुंबई : IPS Amitabh Gupta | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा अमिताभ गुप्ता यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. (IPS Amitabh Gupta)

राज्यातील कारागृहांच्या बळकटीकरणासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. कारागृहांमधील कैद्यांचे पुनर्वसन करणे, त्यांच्यात सुधारणा घडवून आणणे तसेच त्यांच्यातील गुन्हेगारीला प्रतिबंधासाठी कारागृह व सुधार सेवा विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये बंदिवानांच्या कलागुणांना वाव देणे, विशेष माफी, वेतनात वाढ शृंखला उपहारगृह हे उपक्रम काय आहेत तसेच राज्यातील कारागृहांमध्ये या उपक्रमांची अंमलबजावणी कशा प्रकारे सुरु आहे. याबाबत ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून गुप्ता यांनी माहिती दिली आहे. (IPS Amitabh Gupta)

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरुवार, दि. 26 ऑक्टोबर, 2023 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या
समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक पल्लवी मुजुमदार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | पिंपरी-चिंचवडमध्ये मराठा आक्रमक! साखळी उपोषणात दिला इशारा…तोपर्यंत नेत्यांचे कार्यक्रम होऊ देणार नाही

Punit Balan Group-Pune PMC News | शासनानेच निर्बंधमुक्त उत्सवाची घोषणा केल्यानंतर जाहिरात फलकाबाबत पुणे मनपाच्या आकाशचिन्ह विभागाने वैयक्तिक आकसापोटी आणि बदनामीच्या हेतूने बजावलेली नोटीस संपुर्णपणे बेकायदेशीर व चुकीचीच

Pune: Drug smuggler Lalit Patil’s escape from Sassoon Hospital: Rosary School Director Vinay Aranha arrested by Pune police