IPS Atulchandra Kulkrani | अतुलचंद्र कुलकर्णी NIA चे अतिरिक्त पोलीस महासंचालक, तात्काळ कार्यमुक्त करण्याचे महाराष्ट्र सरकारला केंद्राचा आदेश

नवी दिल्ली : IPS Atulchandra Kulkrani | आयपीएस अधिकारी आणि महाराष्ट्र राज्याचे करागृह विभागाचे अतिरिक्त महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी (IPS Atulchandra Kulkrani) यांची गुरूवारी प्रतिनियुक्तीवर राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) अतिरिक्त महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने सध्या स्थितीत केलेली ही नियुक्ती महत्वाची मानली जात आहे. अनेकांनी यावर विविध अंदाज बांधण्यास सुरूवात केली आहे. कुलकर्णी हे 1990 च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी असून ते सध्या पुण्यात एडीजी (कारागृह) म्हणून कार्यरत आहेत.

 

कुलकर्णी यांच्या नियुक्तीबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने आदेश जारी केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने काढलेल्या आदेशात महाराष्ट्र सरकारला कुलकर्णी यांना तात्काळ कार्यमुक्त करण्यास सांगितले आहे. दरम्यान, राष्ट्रीय तपास संस्थेचे पोलीस महानिरीक्षक हे पद आता तात्पुरते अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावर श्रेणीसुधारित म्हणून करण्यात आले आहे. कुलकर्णी यांची ही नियुक्ती एक वर्षाच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत असण्याची शक्यता आहे. (IPS Atulchandra Kulkrani)

 

महाराष्ट्र राज्याचे करागृह विभागाचे अतिरिक्त महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांची एनआयएमध्ये झालेली नियुक्ती महत्वाची मानली जात आहे. सध्याचे राजकीय वातावरण तसेच राष्ट्रीय तपास संस्थेकडून ‘डी गँग’शी संबंधीत तपास सुरू असल्याने ही नियुक्ती महत्वाची मानली जात आहे.

 

कुलकर्णी यांनी आतापर्यंत पार पाडलेल्या प्रमुख जबाबदार्‍या

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) प्रमुख.

राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच CID मध्ये काम केले.

मुंबईत सह. पोलीस आयुक्त (गुन्हे) होते.

 

Web Title :- IPS Atulchandra Kulkarni | ips atulchandra kulkrani is appointed as additional director of general in national investigation agency

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

  1. Heart Health Tips | हृदयरुग्णांसाठी घातक ठरू शकते उष्णता, ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा
  2. Uncleaned Teeth Risk | दात स्वच्छ न केल्याने हृदय-मनोविकारांनाही निर्माण होतो धोका; जाणून घ्या
  3. Mango Panna Benefits | उन्हाळ्यात कैरीच्या पन्हे प्यायल्याने होतात ‘हे’ फायदे