IPS officer Rashmi Shukla | रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती, पहिल्या महिला पोलीस महासंचालक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – IPS officer Rashmi Shukla | आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS officer Rashmi Shukla) यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी (डीजीपी महाराष्ट्र DGP Maharashtra) नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट (Joint Secretary Venkatesh Bhat) यांनी गुरुवारी (दि.4) काढले आहेत. रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक असणार आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Central Public Service Commission) शुक्रवार 29 डिसेंबर रोजी बैठक घेतली. यावेळी महासंचालक पदासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नावांची यादी त्यांनी पाठवली. यामध्ये सर्वात आधी रश्मी शुक्ला (IPS officer Rashmi Shukla) यांचे नाव होते. त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निर्णय घ्यायचा होता. अखेर आज शासनाने शुक्ला यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला.

महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ (IPS Rajnish Seth) हे 31 डिसेंबरला सेवानिवृत्त झाले, त्यानंतर मुंबई
पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर (IPS Vivek Phansalkar) यांच्याकडे महासंचालकपदाचा कार्यभार सोपवण्यात
आला होता, त्यानंतर आता रश्मी शुक्ला यांची महासंचालकपदी नियुक्ती झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत.

रजनीश सेठ (IPS Rajnish Seth) यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
रजनीश सेठ डिसेंबरमध्ये सेवानिवृत्त होणार होते, मात्र त्यांनी याधीच व्हीआरएस घेऊन नवीन जबाबदारी स्वीकारली आहे.
यानंतर रश्मी शुक्ला या राज्यातील सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत.
त्यांच्याकडे महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Shirsat | पवारांसह महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची आव्हाडांना मूकसंमती, ‘त्या’ वक्तव्यावर शिरसाट यांचा आरोप

पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांकडून अटक, पिस्टल व काडतूस जप्त

दुचाकीच्या चाकावरुन आरोपीला अटक, महाळुंगे पोलिसांकडून घरफोडीच्या गुन्ह्यातील 29 लाखांचा ऐवज जप्त

पोलिसांना पैसे देण्याच्या बहाण्याने 20 लाखांची फसवणूक, कोंढवा परिसरातील प्रकार

Nashik Crime News | खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला तलवारीसह नाशिक पोलिसांकडून अटक, 8 महिन्यांपासून होता फरार

रिक्षा चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सिंहगड पोलिसांकडून अटक, तीन रिक्षा जप्त