IPS Saurabh Tripathi | खंडणी प्रकरणात चर्चेत आलेले पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंगडिया व्यापाऱ्यांकडून खंडणी (Angadia Extortion Case) उकळल्याप्रकरणी एलटी मार्ग पोलिस ठाण्यात (LT Marg Police Station) दाखल झालेल्या गुन्ह्यात चर्चेत आलेले (Suspended) पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी (IPS Saurabh Tripathi) यांना शिंदे सरकारने (Shinde Government) मोठा दिलासा दिला आहे. सौरभ त्रिपाठी यांचं निलंबन यापुर्वीच सरकारने मागे घेतले आहे. निलंबन मागे घेतल्यानंतर त्रिपाठी पदस्थापनेच्या प्रतीक्षेत होते. अखेर गृह विभागाने सोमवारी (दि.28) सौरभ त्रिपाठी (IPS Saurabh Tripathi) यांच्या पदस्थापनेचे आदेश काढले असून त्यांची राज्य गुप्तवार्ता विभागात (Maharashtra State Intelligence Department) पदस्थापना करण्यात आली आहे.

अंगडिया प्रकरणात गेल्या वर्षी मार्च महिन्यात पोलीस उपायुक्त सौरक्ष त्रिपाठी (IPS Saurabh Tripathi) यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. यासंदर्भात मुख्य सचिव मनोज सौनिक (Chief Secretary Manoj Saunik) यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समितीची (High Level Committee) स्थापना करण्यात आली होती. या समितीनं सौरभ त्रिपाठी यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेतली. आयपीएस अधिकाऱ्याला तीन महिन्यापेक्षा अधिक काळासाठी निलंबित ठेवता येत नाही. त्यामुळे त्रिपाठी यांचे निलंबन मागे घेण्यात येत आहे, असं या समितीने निर्णय घेताना म्हटले होते.

पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई मागे
घेण्यात आल्यानंतर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली नव्हती.
सोमवारी गृह विभागाने (Maharashtra Home Department) त्रिपाठी यांची उपायुक्त,
राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे पदस्थापना केली आहे. हे आदेश महाराष्ट्र शासनाचे
सह सचिव व्यंकटेश भट ((Joint Secretary Venkatesh Bhat)) यांनी काढले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | लोणी काळभोर: तलवारीचा धाक दाखवून उभा चिरण्याची धमकी; खंडणी मागणार्‍या गुंडाला अटक

ACB Trap On Policeman | समन्स बजाविण्यासाठी लाचेची मागणी, पोलिस अंमलदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Chitra Wagh | ‘उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे फक्त थयथयाट’, चित्रा वाघ यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र (व्हिडीओ)