Ira Khan Wedding | अमीर खानच्या घरी सुरु आहे लग्न सराईची लगबग; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – Ira Khan Wedding | सध्या बॉलीवुडमध्ये (Bollywood) लग्न सराई चालू आहे. एकानंतर एक सेलिब्रिटी लग्न करून संसार सुरु करत आहे. यामध्ये बॉलीवुडचा सुपरस्टार अमीर खान (Ameer Khan) याच्या घरी सुद्धा लगीनघाई सुरू आहे. अमीर खानची मुलगी इरा खान (Ira Khan Wedding) ही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

अमीर खानची मुलगी इरा खान हिने मागील वर्षी तिचा प्रियकर नुपुर शिखरे (Nupur Shikhare) याच्यासोबत साखरपुडा केला होता. इरा आणि नुपुर हि गेली कित्येक वर्षे एकमेकांना डेट करत आहेत. आता लवकरच ते लग्न बंधनात अडकणार आहेत.

Advt.

इराने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटोज् शेअर केले आहेत. यामध्ये तिचे लग्न पत्रिकेसोबतचे फोटो आहेत. इराचे हे फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये इरासोबत नुपुर शिखरे व बाकीचे काही घरातील सदस्य दिसत आहे. यामध्ये अमीर खानची दुसरी बायको किरण राव (Kiran Rao) आणि अभिनेत्री फातिमा शेख (Actress Fatima Shaikh) दिसत आहेत.

 

 

इराने आत्तापर्यंतच्या सुंदर आठवणींच्या फोटोची सिरीज शेअर केली आहे.
यामध्ये इरा आणि नुपुरच्या अनेक क्षणांचे फोटो आहेत. यामध्ये फातिमा शेख केसांचा विग घालून दिसत आहे.
आता खान कुटुंबात इराच्या लग्नाची लगबग दिसत आहे. (Ira Khan Wedding)

सोशल मीडियावर धाकड गर्ल फातिमा आणि मिस्टर परफेक्शनिस्ट अमीर खान यांच्या अफेअरसच्या चर्चा
रंगत असतात. अमीर खानचा दुसरा घटस्फोट झाल्यापासून फातिमा आणि अमीर अनेकदा एकत्र दिसत असतात.
मागील महिन्यात त्या दोघांचा बॅडमिंटन खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
त्यामुळे पुन्हा एकदा अमीर आणि फातिमा यांच्या अफेअरसच्या चर्चेला उधाण आले आहे.
अमीर आणि फातिमाने दंगल चित्रपटात (Dangal Movie) एकत्र काम केलं आहे.
यामध्ये फातिमाच्या वडिलांची भूमिका अमीर खानने साकारली होती.

Web Title : Pune Crime News | Mundhwa Police Station – Attempted gang rape of minor girl; The girl’s daring attempt failed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nagesh Bhonsle | चिडियाखाना : अभिनेते नागेश भोसले बनले मुंबईचे महापौर

Naresh Mhaske | ‘संजय राऊत म्हणजे सिल्व्हर ओकच्या दारातील…’, नरेश म्हस्केंचा राऊतांवर घणाघात

Majhi Vasundhara Abhiyan 3.0 Awards | जागतिक पर्यावरण दिनी माझी वसुंधऱा 3.0 पुरस्कारांचे वितरण; सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी गटात पुण्याचे कलेक्टर डॉ. राजेश देशमुख