तरुणीवर लैंगिक अत्याचार करणारा इराणी नागरिक जेरबंद

पणजी : वृत्तसंस्था – कोलकात्यातील २४ वर्षाच्या तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पेडणे पोलिसांनी एका इराणी नागरिकाला अटक केली आहे.

मजिद अजीज (वय २७) असे या इराणी नागरिकाचे नाव आहे. गेल्या वर्षी मजिद अजीज याला ड्रग्ज बाळगण्याप्रकरणी अटक केली होती. त्यात तो जामीनावर सुटला होता. ही घटना त्याच्या खोलीत २० जानेवारी रोजी घडली होती.

कोलकात्यातील ही युवती हरमल येथे वास्तव्यास आहे. गेल्या दोन महिन्यांपासून येथे ग्राफिक्स डिझायनर म्हणून काम करत होती. आरोपी आणि तिची मैत्री असल्याने ती दोघेही किनारी भागात एका पार्टीत सहभागी झाले होते. त्यानंतर दोघेही रात्री देऊळवाडा-हरमल येथील संशयिताच्या भाड्याच्या खोलीवर गेली. यावेळी आरोपीने बलात्कार केल्याची तक्रार तिने पोलिसांमध्ये २८ जानेवारीला केली. यानंतर पोलिसांनी तातडीने संशयिताला अटक केली.

संशयित मजिद अजीज याला २०१८ साली वागतोर येथे ड्रग्स प्रकरणीही अटक केली होती. नोव्हेंबर २०१८ साली त्याला जामिनावर सोडले होते आणि आता बलात्कार प्रकरणात त्याला पेडणे पोलिसांनी अटक केली आहे.