IRCTC नं गुंतवणुकदारांना 2 वर्षात केलं ‘मालामाल’, एक लाखाचे दिले 10 लाख रुपये; जाणून घ्या ‘कमाई’चा मार्ग

0
137
IRCTC | irctc huge return for investors in 2 years made rs 10 lakh from rs 1 lakh
File Photo

नवी दिल्ली : IRCTC | इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅड टूरिझम अँड कॉर्पोरेशन (IRCTC) लिमिटेडचा दोन वर्षापूर्वी आयपीओ (IPO) आला होता. तेव्हा गुंतवणुकदारांना लिस्टिंगच्या दिवशी 90 टक्केपेक्षा जास्त फायदा झाला होता, जो आज वाढून 970 टक्केपेक्षा जास्त झाला आहे. दोनच वर्षात कंपनीच्या शेयर (stock) ने गुंतवणुकदारांच्या एक लाख रुपयाला 10.70 लाखापेक्षा जास्त बनवले आहे. आज सुद्धा कंपनीच्या शेयरमध्ये 4 टक्केपेक्षा जास्त तेजी दिसून आली आणि 3425 रुपयांसह ऑल टाइम हाय (all-time high) वर पोहचला. तर कंपनीचे मार्केट कॅप (market cap) 52 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे.

दोन वर्षात कंपनीच्या शेयरमध्ये 970 टक्के वाढ

आयआरसीटीसीच्या शेयरमध्ये दोन वर्षात 970 टक्केपेक्षा जास्त वाढ दिसून आली. कंपनीचा आयपीओ दोन वर्षापूर्वी सप्टेंबर महिन्यात 320 रुपये इश्यू प्राईसवर आला होता. ज्याची किंमत आज 3425 रुपयापर्यंत पोहचली आहे. म्हणजे या दरम्यान कंपनीच्या शेयरमध्ये 10 पटीपेक्षा जास्त तेजी दिसून आली आहे.

एक लाखाचे झाले 10.70 लाख रुपये

दोन वर्षापूर्वी जर कुणी 100000 रुपयांची गुंतवणूक केली असतील तर त्यास कंपनीचे 313 शेयर मिळाले असते. ज्यांची किंमत आता 3425 रुपयांच्या हिशोबाने 10.70 लाख रुपये झाली असती. मागील 9 व्यवहारांच्या दिवसाबाबत बोलायचे तर कंपनीने 31 टक्केपर्यंत रिटर्न दिला आहे. 27 ऑगस्टपासून कंपनीच्या शेयरमध्ये लागोपाठ वाढ होत आहे.

आज केला नवीन विक्रम

आज कंपनीचा शेयर पुन्हा 52 आठवड्यांच्या विक्रमी उंचीवर पोहचला. आज व्यवहाराच्या सत्रादरम्यान कंपनीच्या शेयरमध्ये 4 टक्केपेक्षा जास्त तेजीदरम्यान 3425 रुपयांवर पोहचला. तर व्यवहार बंद होण्याच्या दरम्यान कंपनीचा शेयर स्थिर राहात 3292.25 रुपयांवर बंद झाला. एक दिवसापूर्वी कंपनीच्या शेयरमध्ये 9 टक्केपेक्षा जास्त तेजी दिसून आली होती.