खुशखबर ! IRCTCची ‘बंपर’ ऑफर, फक्‍त ४० हजारांमध्ये ६ दिवसांची ‘विदेशी’ सफर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्हाला या पावसाळयात बाहेर फिरण्यासाठी जाण्याची इच्छा असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय उत्तम योजना घेऊन आलो आहोत. त्याचबरोबर भारतात नाही तर विदेशात तुम्हाला या ट्रीपमध्ये फिरायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही परदेश वारीचा देखील अनुभव घेऊ शकता आणि फिरण्याचा देखील आनंद घेऊ शकता. या ट्रीपमध्ये तुम्ही भूतान या भारताच्या शेजारी देशाला भेट देणार असून या देशात जगभरातून पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात. भूतान हा आशियातील सर्वात सुखी लोकांचा देश असून जगभरात या देशाचा आठवा क्रमांक लागतो.

५ रात्र आणि सहा दिवसांचे पॅकेज

तुम्हाला या देशात फिरायला जायचे असल्यास आयआरसीटीसीने एक भन्नाट ऑफर आणली असून या पॅकेजमध्ये तुम्ही या ट्रिपचा पुरेपूर आस्वाद घेऊ शकता. ५ रात्र आणि सहा दिवसांचे हे पॅकेज तुम्हाला ४० हजार ७०० रुपयांत ऑफर करण्यात आले आहे. व्यस्त दिनचर्यातून तुम्हाला स्वतःसाठी काही वेळ काढायचा असल्यास तुमच्यासाठी हि उत्तम संधी आहे.

या तीन शहरांत मनसोक्त फिरा

आयआरसीटीसीने आपल्या वेबसाईटवर हे पाच दिवसांचे पॅकेज उपलब्ध करून दिले असून यामध्ये तुम्ही थिंपू, पारो आणि पुनाखा या शहरांना भेट देणार आहात. या ट्रीपसाठी तुम्ही ड्यूक एयरलाईन्सच्या विमानातून प्रवास करणार आहात. २० सप्टेंबर रोजी दिल्ली विमानतळावरून विमान या ट्रीपसाठी उड्डाण घेईल. आयआरसीटीसीने या ट्रिपचे नाव अलौकिक भूतान असे ठेवले आहे.

या ट्रीपच्या खास गोष्टी

१) पॅकेजचे नाव – अलौकिक भूतान
२) कालावधी – ५ रात्र, ६ दिवस
३) प्रवास – विमान
४) हॉटेल – ३ स्टार
या पॅकेजमध्ये विमान तिकीट, ३ स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा, सकाळचा नाष्टा, आणि संध्याकाळच्या जेवणाची सुविधा देण्यात आली आहे. ७० वर्षांखालील प्रवाशांसाठी आयआरसीटीसीच्या वतीने विमा देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. या ट्रीपमध्ये लाँड्री, गाईड यांसारखी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

आरोग्यविषयक वृत्त –