रेल्वेचं ऑनलाईन तिकीट 35 रुपयांनी महागलं !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार आज पासून ऑनलाईन ई रेल्वे तिकिटांवर लागू केलेल्या सेवा शुल्कांची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे रेल्वेचे वातानुकूलित कोचचे तिकीट साधारण 35 तर स्लिपरचे तिकीट 17 ते 18 रुपयांनी महागले आहे. आयआरसीटीसी मार्फत खरेदी केलेल्या तिकिटांवर हे सेवा शुल्क लागू आहेत.

आयआरसीटीसीने (IRCTC) वातानुकूलीत नसलेल्या (नॉन एसी) वर्गाच्या प्रत्येक तिकीटावर 15 तर वातानुकुलीत (एसी) वर्गाच्या प्रत्येक तिकीटावर 30 रुपयांचा सेवा शुल्क लागू केला आहे. याबाबतचा आदेश आयआरसीटीसीने 30 ऑगस्ट रोजी जारी केला होता. यापूर्वी एसी तिकीटांवर 40 तर नॉन एसी तिकीटांवर 20 रुपये सेवाशुल्क आकारले जात होते. दरम्यान, डिजीटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी हे सेवा शुल्क रद्द करण्यात आले होते. त्यामुळे लोकांचा डिजीटल पेमेंटकडे कल वाढल्याने ऑनलाइन तिकीट काढणाऱ्यांची संख्या वाढली होती. ऑनलाइन तिकीट काढणाऱ्यांची संख्या वाढल्यानंतर पुन्हा सेवा शुक्ल आकरण्यास सुरुवात झाली आहे.

सेवा शुल्कासह 18 टक्के जीएसटीही लागू झाला आहे. त्यामुळे तिकीटाची रक्कम त्यावर 30 किंवा 15 रुपये सेवा शुल्क आणि 3 ते 5 रुपये जीएसटी असे ई तिकीट घ्यावे लागणार आहे. आज (दि. १ सप्टेंबर) पासून याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. मात्र, जीएसटी प्रति प्रवाशी नसून प्रति तिकीट असणार आहे. एकावेळी 6 प्रवाशांचे तिकीट काढता येत असल्यामुळे सेवाशुल्क एका तिकीटासाठी असणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –