‘या’ अभिनेत्री सोबत जवळीक वाढल्यानंच इम्रान खान आणि पत्नी अवंतिका यांच्यात निर्माण झाली दरी ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार आमिर खान (Aamir Khan) चा भाचा आणि अभिनेता इम्रान खान (Imran Khan) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सिनेमांतून गायब असणारा इम्रान अचानक चर्चेत आला होता जेव्हा त्याची पत्नी अवंतिका मलिक खान (Avantika Malik Khan) त्याच्यापासून वेगळी राहू लागली होती. अवंतिका आणि इम्रान खान नात्यात कटुता असल्याच्या अनेक बातम्या गेल्या काही दिवसात समोर आल्या आहेत. आता तर इम्रान सिनेमांपासूनही दूर झाला आहे. अवंतिका इम्रानची दीर्घकाळ गर्लफ्रेंड राहिली होती. नंतर दोघं विवाहबद्ध झाले होते. दोघांचं वेगळं होणं चाहत्यांसाठी शॉकिंग आहे. परंतु याबद्दल दोघांकडूनही अधिकृत स्टेटमेंट समोर आलेलं नाही. आता अशी माहिती आहे की, साऊथ अ‍ॅक्ट्रेस लेखा वॉशिंग्टन इम्रान आणि अवंतिका यांच्यात दरी निर्माण होण्याचं कारण आहे.

लेखाला डेट करतोय इम्रान ?

अवंतिकाची पोस्ट सोशल मीडियावर कायमच लक्ष वेधून घेत असते. दोघं दीर्घकाळ एकत्र राहिले नाहीयेत. सोबत त्यांची कोणती पोस्टही नाहीये. एका इंग्रजी वृत्तानुसार, इम्रान आणि लेखा काही दिवसांपासून डेटींग करत आहेत. लेखाचे पती पाब्लो चॅटर्जी आणि इम्रान चांगले मित्र होते. परंतु लेखा आणि इम्रान यांच्या अफेअरबद्दल कुणालाच कळालं नाही.

रिपोर्टमध्ये हेही सांगितलं आहे की, अवंतिका इम्रानचं घर सोडून निघून गेली. यानंतर इम्राननं लेखाला त्याच्या फ्रेंड्सला भेटवायला सुरुवात केली. यानंतर लेखाच्या आयुष्यातही प्रॉब्लेम यायला लागले. असं जरी असलं तरी या रिपोर्टमध्ये कित तथ्य आहे हे इम्रानच सांगू शकेल.

इम्रान आणि अवंतिकानं 2011 मध्ये केलं होतं लग्न

अवंतिका आणि इम्रान यांनी 2011 साली लग्न केलं होतं. लग्नाआधी दीर्घकाळ त्यांचं रिलेशन होतं. दोघांना एक मुलगी सुद्धा आहे.

या सिनेमात केलंय एकत्र काम मटरू की बिजली का मन डोला सिनेमात लेखानं इम्रानच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती.

इम्रानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो कट्टी बट्टी या सिनेमात अखेरचा दिसला होता. या सिनेमात त्यानं कंगना रणौत सोबत काम केलं होतं. इम्राननं जाने तू या जाने ना, किडनॅप, लक, आय हेट लव्ह स्टोरी अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. देल्ली बेली या सिनेमातील त्याच्या कामाचं कौतुकही झालं आहे. याशिवाय आमिर खानच्या कयामत से कयामत तक आणि जो जीता वही सिकंदर या सिनेमातही इम्राननं बाल कलाकार म्हणून काम केलं आहे. 2008 साली त्यानं बॉलिवूड डेब्यू केला होता. 2015 पर्यंत तो सिनेमात सक्रिय होता.