‘या’ नवख्या अभिनेत्रीच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे बोनी कपूर चिंताग्रस्त

मुंबई :वृत्तसंस्था – सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांनी २०१८ मध्ये बॉलिवूडमध्ये दणक्यात पदार्पण केलं जान्हवीच्या ‘धडक’ आणि साराच्या ‘केदारनाथ’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. जान्हवीने करण जोहरच्या ‘धडक’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं खरं पण तिला हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही. जान्हवी नंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या साराला तिच्यापेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाली. सारा अली खान अगदी पहिल्याच सिनेमापासून प्रेक्षकांची आवडती बनली. ‘केदारनाथ’ आणि आता त्यामागून ‘सिंबा’ या दोन्ही सिनेमांनी साराला लोकप्रियता आणि प्रेक्षकांच भरभरून प्रेम दिलं. या सगळ्या गोष्टींमुळे तिच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर दुसरीकडे जान्हवी थोडी मागे राहिली आहे. साराचं सतत चर्चेत राहणं जान्हवीचे वडील बोनी कपूर यांच्यासाठी चिंतेचा विषय ठरला आहे.
बोनी कपूर या गोष्टीमुळे चिंतेत आहेत की, त्यांची मुलगी जान्हवी कपूर लोकांमध्ये तशी लोकप्रियता मिळवू शकली नाही जेवढी लोकप्रियता सारा अली खानला मिळाली या विषयी त्यांनी जान्हवीच्या पीआर टीमला चांगलेच सुनावले असल्याचे समजले आहे. ज्याप्रकारे साराची प्रसिद्धी होत आहे, त्याप्रकारे जान्हवीची का होत नाही असा सवाल त्यांनी पीआर मॅनेजर्सना विचारल्याचं समजतंय. एकंदर काय तर बोनी कपूर यांना लेकीच्या  भविष्याची चिंता सतावत असून त्यांनी  हा राग पीआर टीमवर काढला आहे.
तसेच  सध्या सोशल मीडियावरसुद्धा साराचीच चर्चा आहे. त्यामुळे येत्या काळात या दोघींमध्ये चांगलीच स्पर्धा होणार असून यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं  ठरणार आहे.जान्हवी कपूरच्या हातात सध्या दोन चित्रपट आहे  धर्मा प्रॉडक्शन्सचा  ‘तख्त’ आणि गुंजन सक्सेना यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात
पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like