Ishaan Sehgal and Miesha Iyer | गोव्यामध्ये रोमँटिक झाले बिग बाॅस फेम ईशान सेहगल आणि माइशा अय्यर, KISS करत केला व्हिडीओ शेअर

गोवा – Ishaan Sehgal and Miesha Iyer | बिग बॉस 15 च्या घरात अवघ्या तीन दिवसात प्रेमात पडलेलं जोडपं म्हणजे ईशान सहगल आणि माइशा अय्यर (Ishaan Sehgal and Miesha Iyer). तीनच दिवसात प्रेमात पडल्याने या दोघांमधील प्रेम खोटं असल्याचं अनेक लोकांचं म्हणणं होतं. मात्र बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर देखील या जोडप्यामधील प्रेम कायम राहिल्याचे दिसून येत आहे.

 

इशान सेहगल आणि माइशा अय्यर (Ishaan Sehgal and Miesha Iyer) दोघेही गोव्याला आपले रोमँटिक दिवस घालवत आहेत. इंस्टाग्राम वर दोघांनी अनेक फोटोज आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यामधील एक व्हिडिओमध्ये ईशानने माइशाला गालावर किस (Kiss) केल्याचे दिसून येत आहे. तसेच पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान करून केलेल्या फोटोला माइशाने ‘त्याला सुद्धा पिझ्झा आवडतो’ (He loves pizza too), असं कॅप्शन दिलं आहे.

 

 

https://www.instagram.com/p/CWTNiiQKFR2/?utm_source=ig_web_copy_link

 

इंस्टाग्राम स्टोरीवर देखील गोवा वेकेशनचे अनेक फोटोज आहेत. दोघांचे फोटो बघून दोघे एकमेकांसोबत किती खूष (Happy) आहेत याचा अंदाज लावण्यात येऊ शकतो. गोव्यामध्ये माइशाने परिधान केलेले स्टायलिश कपडे (Fashionable Clothes) पाहून अनेक लोक तिच्याकडे आकर्षित झाले आहेत. तसेच इशान नेहमीप्रमाणेच स्मार्ट आणि डॅशिंग दिसत आहे.

 

दरम्यान, अवघ्या तीन दिवसात एकमेकांच्या प्रेमात पडल्याने अनेकांनी माइशा आणि इशानच्या नात्यावर प्रश्न उपस्थित केले होते.
शोमध्ये देखील दोघे अनेक वेळा रोमँटिक होताना दिसले होते.
त्यामुळेच ‘विकेंड का वाॅर’ (Weekend Ka War) मध्ये सलमान खानने (Salman Khan)
त्या दोघांनाही आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास सांगितलं होतं. मात्र दोघांमधील प्रेम हे अजूनही तसंच असल्याचा दोघांनी सिद्ध केलं आहे.

 

Web Title :- Ishaan Sehgal and Miesha Iyer | bigg boss 15 miesha iyer ieshaan sehgaal romantic in goa vacation photos

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा