Advt.

Devendra Fadnavis | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात; म्हणाले – ‘कायद्याचं राज्य नव्हे, ‘काय ते द्या’चं राज्य’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | भाजपा (BJP) महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज (मंगळवारी) मुंबईत होत आहे. त्यावेळी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray government) जोरदार घणाघात केला आहे. ”महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारची नोंद इतिहासामध्ये होणार आहे,” अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, ”राज्यात हजारो कोटींची लूट सध्या सुरू आहे.
शेतकऱ्यांच्या वाटेला काहीच येत नाही, तसेच, सध्याचं हे सरकार म्हणजे कायद्याचं राज्य नसून काय ते द्या..फक्त घेण्याचं, वसुली करण्याचं राज्य चालवत आहे,” अशा शब्दांत फडणवीस यांनी राज्य सरकारचा तिरस्कार केला आहे.

पुढे फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारची नोंद इतिहासामध्ये होणार आहे. आज ज्या प्रकारे वसुली चाललेली आहे, म्हणजे केवळ माजी गृहमंत्री जेलमध्ये आहेत एवढ्यापुरतं हे सीमित नाही. जसा एक वाझे आपण बघितला, तसा प्रत्येक विभागात एक वाझे आहे. आणि ज्याप्रकारे सरकार सामान्यांकरता नाही, तर सरकार जे चाललेलं आहे ते कायद्याचं राज्य नाही, काय ते द्याचं राज्य . फक्त आम्हाला काय मिळणार? आणि आपण जर एक एक आकडा बघितला तर मन थक्क होईल. असं फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

हे देखील वाचा

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर ! वेतनवाढीबरोबर ‘या’ मोठ्या घोषणा होऊ शकतात, जाणून घ्या

MHADA | म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी आजपासून ऑनलाइन अर्ज

Chitra Wagh Letter To Ajit Pawar | राष्ट्रवादीला ‘सोडचिठ्ठी’ देऊन भाजपात गेलेल्या चित्रा वाघ यांचं अजित पवारांना पत्र, म्हणाल्या…

Hardik Pandya Watch | हार्दिक पांड्याकडून 5 कोटींची घड्याळं जप्त, मुंबई कस्टम विभागाकडून कारवाई

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Devendra Fadnavis | devendra fadnavis speaking in bjp maharashtra executive meeting

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update