‘चंद्रयान 2’ : ‘लॅन्डर’ विक्रम पुन्हा करू शकतो ‘पराक्रम’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चंद्रावर लँडिंगच्या अंतिम टप्प्यामध्ये असताना विक्रम लँडरचा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला असला तरी इस्त्रोने हार मानलेली नाही. विक्रम लँडर त्याच्या निश्चित जागेपासून सुमारे 500 मीटर अंतरावर चंद्रावर पडला आहे, परंतु संपर्क स्थापित झाल्यास तो परत आपल्या पायावर उभा राहू शकेल असा विश्वास इस्रोला आहे. कारण विक्रम लँडरमध्ये असे तंत्रज्ञान आहे की ते पडल्यानंतरही ते स्वत:च्या पायावर उभे राहू शकते, मात्र त्यासाठी त्याच्या कम्युनिकेशन सिस्टमशी संपर्क साधणे आणि आदेश प्राप्त करणे आवश्यक आहे.

विक्रम लँडरमध्ये ऑनबोर्ड कॉम्प्युटर आहे. हा कॉम्प्युटर स्वतःहून अनेक कामे करू शकतो. मात्र लँडर पडल्याने त्याचा अँटेना दबला गेला आहे. या अँटेनाद्वारे कम्युनिकेशन सिस्टमला आज्ञा पाठविली जाऊ शकते. सध्या इस्रोचे शास्त्रज्ञ त्या अँटेनाद्वारे लँडरला पुन्हा त्याच्या पायावर उभे राहण्याची आज्ञा देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

विक्रम लँडर त्याच्या पायावर कसा उभा राहू शकतो ; जाणून घ्या

इस्रोच्या सूत्रांनी सांगितले की, विक्रम लँडरच्या खालच्या बाजूला पाच थ्रस्टर आहेत. ज्याद्वारे चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्यात येणार होती. विक्रम लँडरभोवती थ्रस्टर देखील बसवले गेले आहेत, जे अंतराळात प्रवास करताना त्याची दिशा ठरवण्यासाठी चालू केले होते. हे थ्रस्टर अजूनही सुरक्षित आहेत. लँडरच्या ज्या भागामध्ये अँटेना दबलेला आहे. त्याच भागात हे थ्रस्टर आहेत. जर पृथ्वीवर स्थित ग्राऊंड स्टेशन वरून पाठवलेली आज्ञा सरळ किंवा ऑर्बिटरच्या माध्यमातून दबलेल्या अँटेनाने प्राप्त केली गेली तर त्याचे थ्रस्टर चालू केले जाऊ शकतात. जेव्हा थ्रस्टर चालू केले जातील, तेव्हा विक्रम एका बाजूने उठून त्याच्या पायावर उभा राहू शकतो.

असे झाल्यास या अभियानाशी संबंधित सर्व प्रयोग शक्य होतील, जे चंद्रयान -२ बद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांनी यापूर्वीच ठरवले होते.

आरोग्यविषयक वृत्त –