१६ व्या मिनिटात पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावले ‘चांद्रयान- २’ ; जाणून घ्या चांद्रयान २ चा पुढील ‘प्रवास’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन  इस्रोने चांद्रयान २ लाँच करून एक नवीन इतिहास रचला आहे. चांद्रयान २ च्या लॉंचिंगनंतर आता चंद्राच्या भूमीवर यान उतरविण्याची मिशन सुरु झाली आहे. चांद्रयान २ यान चंद्रापर्यंत पोहचण्यासाठी ३ लाख ८४ हजार किमीचा प्रवास करावा लागणार आहे. चांद्रयान २ फक्त १६ मिनिटानंतर पृथ्वीच्या कक्षेत पोहचले. जवळपास ५० दिवसानंतर चांद्रयान २ यान चंद्रावर पोहचेल.६ ते ८ सप्टेंनबर दरम्यान चांद्रयान चंद्रावर पोहचेल.

चांद्रयान २ मिशनला शक्तिशाली रॉकेट GSLV MK – ३ ने लॉन्च केले. हे यान आता १६ दिवस पृथ्वीला प्रदक्षिणा घालेल आणि त्यानंतर या यानाचा प्रवास चंद्राच्या दिशेने सुरु होईल. यादरम्यान यानाचा जास्तीजास्त वेग हा १० किमी प्रति सेकंद आणि कमीतकमी ३ किमी प्रति सेकंद असा असेल.
NBT

२१ दिवसानंतर चंद्राच्या कक्षेत पोहचणार
१६ दिवस पृथ्वी प्रदक्षिणा केल्यानंतर यान चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु करेल. यादरम्यान चांद्रयान २ पासून रॉकेट वेगळे होईल. ५ दिवसानंतर म्हणजे २१ व्या दिवशी चांद्रयान २ चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. प्रवेश केल्यानंतर यानाच्या चंद्राला प्रदक्षिणा सूरु होतील. यानंतर लँडिंगची प्रक्रिया सुरु होईल.

चंद्राच्या भूमीवर उतरण्याचा प्रवास
पृथ्वी आणि चंद्राच्या दरम्यान ३ लाख ८४ हजार किलोमीटर इतके अंतर आहे. चांद्रयान २ मध्ये लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान चंद्रावर पोहचेल. चंद्राच्या जमिनीवर उतरण्याच्या ४ दिवस आधी लँडर विक्रम चंद्रावर उतरण्याची जागा निश्चित करेल. लँडर यानापासून डीबूस्ट होईल आणि चंद्राच्या दिशेने प्रवास करेल. विक्रम चंद्राच्या भूमीजवळ जाईल.

ज्या ठिकाणी उतरायचे आहे त्या ठिकाणची तपासणी केली जाईल. यानंतर लँडिंगची प्रक्रिया सुरु होईल. लँडिंग झाल्यानंतर लँडर विक्रमचा दरवाजा उघडेल आणि रोव्हर प्रज्ञान विक्रमधून बाहेर येईल. रोव्हर लँडरमधून बाहेर येण्यासाठी ४ तासाचा वेळ लागेल. यानंतर रोव्हर वैज्ञानिक परीक्षणासाठी चंद्रावर प्रवास करेल. यानंतर १५ मिनिटाच्या आत चंद्रावरील फोटो प्रज्ञानकडून इस्रोकडे पाठवायला सुरवात होईल.

आरोग्यविषयक वृत्त –