तेलंगणात सापडलेल्या 10 कोटींचं कनेक्शन नागपूरशी ?

ADV

नागपूर : पोलीसनामा आॅनलाईन –  नागपूर येथून मोठी बातमी समोर आली आहे. नागपुरातील मस्कासाथ परिसरात आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. एका इमारतीत खासगी लॉकर्स असल्याचं आयकर विभागाच्या लक्षात आलं. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या इमारतीत गेल्या दोन दिवसांपासून गोपनीय चौकशी सुरु केली आहे.

परिस्थिती अशीच राहिल्यास निर्णय घेण्यास सक्षम : खडसे

तेलंगणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सीमेवर नाकाबंदी करत वाहनांची तपासणी करत होते. महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील पिंपरेवाडा टोल नाक्याजवळ तेलंगणा पोलिसांनी 19 ऑक्टोबर रोजी एका गाडीतून 10 कोटी रुपये जप्त केले होते. केए46 एम 6095 या क्रमांकाच्या ब्रीझा कारमध्ये पाच पोत्यांमध्ये भरलेले 10 कोटी रुपये पोलिसांना सापडले होते. कारचालकाने ही रक्कम नागपूरच्या मस्कासाथ परिसरातून आणल्याचं पोलिसांना सांगितलं होतं. त्यानंतर तेलंगणा पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर आयकर विभागाने ही कारवाई केली आहे.

ADV

गेल्या दोन दिवसांपासून आयकर अधिकाऱ्यांना मस्कासाथ परिसरातल्या त्या इमारतीत एक नव्हे तर अनेक लॉकर्स सापडल्याची माहिती होती. आयकर अधिकाऱ्यांनी मस्कासाथ परिसरात एका इमारतीवर लक्ष केंद्रीत करत चौकशी सुरु केली होती. या इमरतीतून अनेक व्यापाऱ्यांसाठी खाजगी लॉकर सेवा तर पुरविली जात नव्हती ना, याची चौकशी आयकर विभाग करत आहे. तसंच या खाजगी लॉकर्समध्ये कोणकोणत्या व्यापाऱ्यांचे, नेत्यांचे घबाड लपवले आहे का याची चौकशीही आयकर अधिकारी करत आहेत.

सीबीआयचे नवे प्रभारी संचालकपदी एम नागेश्वर राव

या इमारतीशिवाय नागपुरातील कळमना, सतरंजीपुरा आणि रामदासपेठ परिसरात ही प्रत्येकी एका ठिकाणी चौकशीचे काम सुरु असल्याचे आयकर विभागातील सूत्रांनी सांगितले आहे.