IT Refund | इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 13 डिसेंबरपर्यंत टॅक्सपेयर्सला पाठवले 1.36 लाख कोटी रुपये, ‘या’ पध्दतीनं तपासा रिफंड स्टेटस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – IT Refund | इन्कम टॅक्स डिपार्टमेंट (Income Tax Department) ने चालू आर्थिक वर्षात (2021-22) 13 डिसेंबरपर्यंत 1.27 कोटीपेक्षा जास्त टॅक्सपेयर्सला 1,36,779 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम रिफंड केली आहे. हा आकड़ा 1 एप्रिल 2021 पासून 13 डिसेंबर 2021 च्या दरम्यान झालेल्या रिफंडचा आहे. यापैकी पर्सनल इन्कम टॅक्स रिफंड 46,438 कोटी रुपये होता, तर कॉर्पोरेटचा टॅक्स रिफंड 90,340 कोटी रुपये आहे. यामध्ये असेसमेंट ईयर 2021-22 साठी 18,848.60 कोटी रुपयांच्या 90.95 लाख रिफंडचा समावेश आहे. (IT Refund)

 

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ट्विट करत म्हटले की, सीबीडीटीने एक एप्रिल 2021 पासून 13 डिसेंबर, 2021 च्या दरम्यान 1.27 कोटीपेक्षा जास्त टॅक्सपेयर्सला 1,36,779 कोटी रुपयांचा रिफंड जारी केला आहे. 1,25,34,644 प्रकरणांमध्ये 46,438 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स रिफंड केला आहे, तर 2,02,705 प्रकरणांमध्ये 90,340 कोटी रुपयांचा कंपनी टॅक्स रिफंड केला आहे. (IT Refund)

 

मागील आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 2.38 कोटी टॅक्सपेयर्सला 2.62 लाख कोटी रुपयांचा टॅक्स रिफंड जारी केला होता. हा आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये जारी 1.83 लाख कोटी रुपयांच्या रिफंडपेक्षा 43.2 टक्के जास्त होता.

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नवीन वेबसाइटवरून चेक करा रिफंड स्टेटस –

सर्व प्रथम वेबसाइट www.incometax.gov.in वर जावे लागेल.

यूजर आयडी आणि पासवर्ड टाका.

लॉग इनच्या नंतर ई-फायलिंगचे ऑपशन दिसेल.

आता इन्कम टॅक्स रिटर्न्स सिलेक्ट करा.

यानंतर व्ह्यू फाईल रिटर्नवर क्लिक करा.

आता आयटीआरची डिटेल्स दिसेल.

 

Web Title :- IT Refund | income tax department issued rs 1 36 trillion income tax refunds in 2021 so far

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | मित्र पत्नीसोबत ‘मज्जा’ मारायचे अन् पतीला मिळायचं ‘सुख’ आणि मिळायचा ‘आनंद’, पुण्याच्या बारामतीमधील धक्कादायक घटना; जाणून घ्या भयावह स्टोरी

Oblique Lines On Indian Notes | 100, 200, 500 आणि 2000 च्या नोटांवर रेषा का छापलेल्या असतात? जाणून घ्या काय असतो अर्थ आणि का आहे आवश्यक

BJP-MNS Alliance | पुणे महापालिकेसाठी भाजप-मनसे युती नाही?, राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका