इटलीच्या नाईट क्लब मध्ये झालेल्या चेंगरा चेंगरीत ६ जणांचा मृत्यू 

रोम : वृत्तसंस्था – इटलीतील अँकोना शहरातील एका नाईट क्लब मध्ये शनिवारी रात्री चेंगराचेंगरी झाली या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला असून १०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहे. जखमींमध्ये १० जण अत्यवस्तेत आहे प्राथमिक तपासात अशी माहिती समोर आली आहे की , पार्टी सुरू असताना काही लोकांवर ब्लॅक पेपर स्प्रे मारण्यात आला. यानंतर भीतीने लोकांनी पळापळ सुरू केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, लँतेर्ना अॅझुरा या क्लबमध्ये एका प्रसिद्ध डीजेचा शो सुरू होता. दुर्घटना घडली त्यावेळी त्या ठिकाणी जवळपास १००० लोक उपस्थित होते.

स्फेरा एबास्ता नावाने प्रसिद्ध असलेला२६ वर्षीय रॉकस्टार जियोनाता बोशेती इटलीतील सर्वात प्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहे. लँतेर्ना अॅझुरा क्लबमध्ये त्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे, जवळपास १००० लोकांनी क्लबमध्ये गर्दी केली होती. इटलीच्या स्थानिक वेळेनुसार, शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्रीनंतर १ वाजता ही दुर्घटना घडली आहे.

जखमी झालेल्यांना  तातडीने उपचारासाठी रुगणालयात दाखल करण्यात आले आहे. यातीलकाही लोकांचे  हात किंवा पाय मोडलेअसून
तर १० जण हे अत्यवस्तेत आहे या मुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातआहे.स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथकाने ट्विटरवर यासंदर्भातील फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.