ITR Filing | फॉर्म 16 शिवाय भरू शकता इन्कम टॅक्स रिटर्न, सविस्तर जाणून घ्या पद्धत

नवी दिल्ली : ITR Filing | फॉर्म 16 एक असे महत्वाचे कागदपत्र आहे ज्याचा वापर वेतनदार कर्मचारी आपला आयकर रिटर्न (ITR Filing) दाखल करताना करतात. बहुतांश नोकरदार लोकांसाठी फॉर्म 16 शिवाय आयटीआर दाखल करणे जवळपास अशक्य आहे.

फॉर्म 16 न मिळण्याचे कारण

परंतु अनेकदा असे दिसून आले आहे की, इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची वेळ होते आणि ऑफिसमधून फॉर्म 16 मिळत (ITR Filing) नाही. असे यामुळे सुद्धा होऊ शकते की कंपनी आपला व्यवसाय बंद करत असेल किंवा तुम्ही सर्व प्रक्रिया पूर्ण न करताच नोकरी बदलली असेल.

फॉर्म 16 शिवाय दाखल करा रिटर्न

जर तुमच्याकडे फॉर्म 16 नसेल आणि आयटीआर दाखल करण्याची वेळ निघून जात असेल तर तुम्ही फॉर्म 16 शिवाय रिटर्न दाखल करू शकता. ज्या पगारदार कर्मचार्‍यांकडे फॉर्म 16 (ITR Filing) नसेल ते आपला आयटीआर कशाप्रकारे दाखल करू शकता –

वेतनावरून इन्कमची गणना करा (Income from Salary)

प्रथम वेतनातून होणार्‍या इन्कमची गणना करा. यासाठी पे-स्लिप (salary slips) ची मदत घेऊ शकता. आर्थिक वर्षादरम्यान जिथे-जिथे तुम्ही काम केले आहे तिथून मिळणारी पे-स्लिप सांभाळून ठेवावी लागेल. यावर्षी सुद्धा तुम्हाला आपल्या वेतनाची पूर्ण माहिती द्यावी लागेल.

ही माहिती द्यावी लागेल

यामध्ये तुम्हाला सकल वेतन (कलम 17(1) के नुसार वेतन, अनुज्ञप्तीचे मूल्य 17(2), वेतन 17(3) च्या बदल्यात लाभाची रक्कम, कलम 10 च्या अंतर्गत सूट, कलम 16 च्या अंतर्गत कपात, मनोरंजन भत्ता (केवळ सरकारी कर्मचार्‍यांसाठी), आणि व्यावसायिक कराची माहिती द्यावी लागेल.

तुमच्या सॅलरी स्लीपमध्ये वर सांगितलेले आकडे असावेत. मात्र, अनेक कंपन्या स्लीपमध्ये ‘अनुज्ञप्तीचे मूल्य’ आणि ‘वेतनाच्या बदल्यात लाभाची’ रक्कम प्रदान करत नाहीत.

Sameer Wankhede | नवाब मलिकांनी क्रांती रेडकरच्या बहिणीबाबत केलेल्या सवालावर समीर वानखेडेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

फॉर्म-12बीए मागू शकता

यासाठी तुम्ही एचआर किंवा अर्थ विभागाकडून फॉर्म-12बीए मागू शकता. या फॉर्ममध्ये कंपनीने दिलेल्या वेतनाच्या बदल्यात अनुज्ञप्तीचे मूल्य आणि लाभाच्या रक्कमेची माहिती असते.

सॅलरी स्लीपमध्ये काय असते

या तमाम माहितीशिवाय, तुमची सॅलरी स्लीप तुम्हाला देण्यात आलेले सर्व भत्ते, भविष्य निर्वाह निधी (पीएफ), स्रोतावर कपात (टीडीएस) इत्यादी दर्शवते.

भत्ते दोन प्रकारचे असू शकतात

येथे त्या भत्त्यांचा वापर करा जे तुमची कर देयता जसे की एचआरए, एलटीए इत्यादी कमी करण्यात मदत करतात. मात्र, भत्त्यांची गणना करताना लक्ष असू द्या, कारण काही भत्ते आंशिक प्रकारे सूट प्राप्ती देणारे आहेत आणि काहींवर पूर्णपणे सूट आहे.

करसवलत असलेल्या भत्त्यांचा करा उल्लेख

टॅक्स सूटवाल्या भत्त्यांच्या रक्कमेचा उल्लेख आयटीआरमध्ये करणे आवश्यक आहे.
याशिवाय, कलम 16 (ia) अंतर्गत 50,000 रुपयांच्या मानक कपातीचा दावा करण्यास विसरू नका. (ITR Filing)

कापलेला टीडीएस फॉर्म 26AS सोबत मिळवा

फॉर्म 26AS मध्ये वेतन उत्पन्न आणि इतर उत्पन्नावर कापलेल्या टीडीएसची माहिती असावी.
फॉर्म 26AS मध्ये दाखवलेल्या आकड्यांसह आपला टीडीएस क्रॉस चेक करणे महत्वाचे आहे कारण यामध्ये आकडे वेगवेगळे असू शकतात.

गृह संपत्तीवरून उत्पन्नाची गणना करा

जर तुम्ही मालकीचे घर भाड्याने देण्यातून काही उत्पन्न मिळवत असाल तर तुम्हाला या शीर्षकांतर्गत याचा रिपोर्ट करण्याची आवश्यकता आहे.
याशिवाय, जर तुम्ही तुमची भाड्याने दिलेल्या संपत्तीवर किंवा स्वताच्या कब्जातील संपत्तीवर जर एखादे गृहकर्ज घेतले असेल आणि कर्जावर व्याज भरत असाल तर तुम्हाला शीर्षकाखाली त्याची कपात मिळेल.

हे देखील वाचा

Pune Blood Donation Camp | महापौरांचा वाढदिवस ठरणार ‘रक्तदान महासंकल्प दिवस’ ! 9 नोव्हेंबरला रक्तदान शिबीर, रक्ताचा तुटवडा कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल

LPG Cylinder Price | तुम्हाला स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरसाठी मोजावे लागतील 1000 रुपये ! जाणून घ्या मोदी सरकारची योजना?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : ITR Filing | income tax return filing without form 16 for itr filing online

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update