ITR ‘व्हेरिफीकेशन’ अनिवार्य, आयकर विभागाकडून ‘ही’ नवी ‘सुविधा’, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयकर विभाग कायमच आपल्या आयकरदात्यांना कर भरण्यास प्रोस्ताहन देण्यासाठी विविध सेवा देते. आता आयकर विभागाने आयकर रिटर्न भरणाऱ्यांना व्हेरिफिकेशन करण्याची नवी सुविधा दिली आहे. या सुविधेअंतर्गत करदात्यांना कोणत्याही लॉगिंन शिवाय आपले आयटीआर व्हेरिफिकेशन करता येणार आहे.

ही आहे वेरिफाय करण्याची लिंक
आयकर विभागने आयटीआर व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपल्या ई फायलिंग पोर्टलवर एक नवीन https://www.incometaxindiaefiling.gov.in/home लिंक सुरु केली आहे. ही लिंक ई व्हेरिफाय रिटर्न नावाने क्विक सेक्शन मध्ये देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर ई व्हेरिफिकेशन पेज ओपन होईल. येथे पॅन कार्ड, असेसमेंट ईयर आणि आयटीआर फॉर्म – ५ वर देण्यात आलेल्या पावती नंबरवरील माहिती देऊन आयटीआर व्हेरिफाय करु शकतात.

१२० दिवसात वेरिफाय करावे लागेल आयटीआर
आयकर विभागानुसार, आयटीआर दाखल केल्यानंतर १२० दिवसात व्हेरिफाय करावे लागेल. तुम्ही आयटीआर दाखल केल्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट असल्याने त्यानंतर देखील तुम्ही याला व्हेरिफाय करु शकतात. जर तुम्ही आयटीआर व्हेरिफाय केले नाही तर ही प्रकिया पूर्ण होणार नाही आणि तुमचा आयटीआर फाइल केली जाणार नाही तसेच तुम्हाला दंड देखील भरावा लागेल. आयटीआर वेरिफिकेशन ही आयटीआर फायलिंगचा टप्पा आहे. जर तुम्ही आयटीआर फाइल केला आणि व्हेरिफिकेशन झाले नसेल तर तुमच्या आयटीआर फायलिंगचा विचार केला जाणार नाही.

आरोग्यविषयक वृत्त