‘इथं’ होतोय प्लास्टिकचा पाऊस, संशोधकांनी केला ‘धक्कादायक’ खुलासा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही कधी प्लॅस्टिकच्या पावसाविषयी ऐकले आहे काय ? मात्र नुकतेच अमेरिकेत करण्यात आलेल्या अभ्यासात आढळून आले आहे कि, प्लॅस्टिकच्या कणांचा पाऊस होत असून यामुळे निसर्गाला मोठा धोका आहे. हा सर्व्हे अमेरिकेतील जियोलॉजिकल आणि इंटीरियर डिपार्टमेंटच्या वैज्ञानिकांनी केला असून उघड्या डोळ्यांनी त्यांना हे प्लस्टिकचे कण दिसले नसून मायक्रोस्कोप आणि डिजिटल कॅमेऱ्याच्या मदतीने त्यांनी पावसात या कणांचा शोध लावला आहे.

या सर्व्हेत घेण्यात आलेल्या सॅम्पलमधील पाण्यात ९० टक्के पाण्यात हे कण आढळून आले आहेत. यामध्ये रंगीबेरंगी प्लास्टिक सामील होते. शहरी भागात ग्रामीण भागाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आढळून आले. हे प्लॅस्टिक कुठून आले याचा जरी शोध लागला नसला. तरीही संपूर्ण जगभरात या प्लस्टिक वापराने कहर केला असल्याचे या सर्व्हेतून सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर आपल्या पर्यावरणात म्हणजेच हवेत, पाण्यात आणि मातीत किती प्रमाणात प्लास्टिक सामावले आहे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या वैज्ञानिकांनी याआधी देखील पावसाच्या पाण्यात प्लास्टिक सापडल्याचे म्हटले आहे.

दक्षिण फ्रान्समध्ये देखील अशाप्रकारे प्लास्टिकचे कण पाण्यात आढळून आल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर एका आठवड्यात व्यक्ती सरासरी ५ ग्रॅम प्लास्टिक खात असून त्याचे वजन एका क्रेडिट कार्ड इतके होते. या सर्व्हेत सहभागी झालेल्या वीदरबी यांनी सांगितले कि, या अभ्यासात सर्वात महत्वाची गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे आपण जितका विचार करतो त्यापेक्षा अधिक प्लास्टिक आपल्या पर्यावरणात असल्याचे त्यांनी म्हटले.

दरम्यान, या प्लास्टिकवर काही उपाय आहे का ? या प्रश्नावर बोलताना त्यांनी म्हटले कि, जर आपण जादूची छडी जरी फिरवली तरी आपण सांगू शकत नाही कि, पृथ्वीवरील प्लास्टिक कधी नष्ट होईल. त्यामुळे ते अनंत काळासाठी आपल्या नद्यांमध्ये तसेच राहणार आहे. त्यामुळे यासाठी अनेक दशके आपल्याला वाट पाहावी लागणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like