Izzat MST | रेल्वेने कमी केली माननीयांची ’इज्जत’, नियमांमध्ये केले ‘हे’ बदल, गरिब प्रवाशांच्या अडचणी वाढणार

0
92
Izzat MST | indian railways izzat monthly ticket irctc
File Photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Izzat MST | इज्जत एमएसटी योजनेचा लाभ घेणार्‍या गरिबांसाठी ही बातमी वाईट आहे. कारण योजनेतील गडबडीच्या तक्रारी पाहता आता रेल्वे याचा दर वाढवण्यासह नियमात बदल करण्याचा विचार करत आहे. आता केवळ लोकप्रतिनिधींच्या दाखल्याच्या आधारावर तुम्हाला इज्जत मासिक सिजन तिकीट (Izzat Monthly Season Tikit) मिळणार नाही. कारण इज्जत मासिक तिकिट नियमात (Izzat MST) बदल केला आहे.

 

दरसुद्धा वाढवले जाण्याचे वृत्त

 

माहितीनुसार, आता पॅसेंजरला फॉर्मसह गट विकास अधिकारी, तहसीलदार आणि उप जिल्हाधिकारी यांनी प्रमाणित केलेला उत्पन्नाचा दाखला सुद्धा जोडावा लागेल. केवळ लोकप्रतिनिधींनी जारी केलेल्या प्रमाणपत्राच्या आधारावर आता इज्जत एमएसटी मिळणार नाही. दुसरीकडे गडबड पाहता दर सुद्धा वाढवले जाण्याचे वृत्त (Izzat MST) आहे.

 

गरिबांसाठीच आहे योजना

 

इज्जत एमएसटी (Izzat MST) अशा मजूर आणि दारिद्रय रेषेखालील लोकांसाठी आहे, ज्यांचे मासिक उत्पन्न 2500 रुपयांपेक्षा नसेल.
अशा सर्व लोकांसाठी रेल्वे अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इज्जत मासिक सीजन तिकिट जारी करते.
यासाठी त्यांना फॉर्मसह उत्पन्नाचा दाखला जारी करावा लागतो.

 

अवघ्या 25 रूपयात सुविधा

 

प्रवासभाडे म्हणून रेल्वे त्यांच्याकडून केवळ 25 रुपये घेते. हे तिकिट सर्व पॅसेंजर ट्रेनमध्ये केवळ द्वितीय श्रेणी तसेच त्या एक्स्प्रेस सुपरफास्ट ट्रेनमध्ये ज्यांचे अंतर 150 किलोमीटर पेक्षा जास्त नसेल.
हे अंतर अगोदर अवघे 100 कि.मी. होते.

 

असे मिळत होते तिकीट

 

इज्जत मासिक तिकिटासाठी (Izzat MST) पात्र व्यक्तीला आपल्या मतदार संघातील खासदाराकडून लेटरपॅडवर लिहून घ्यावे लागत होते.
सोबतच या लेटरपॅडसोबत संबंधित व्यक्तीचा उत्पन्नाचा दाखला सुद्धा जोडावा लागत होता.
ज्याच्या आधारावर रेल्वे सदर व्यक्तीला खरोखर पात्र मानत होते आणि एमएसटी जारी करत होते.

 

योजनेत सुरू होती गडबड

 

म्हणजे ज्या व्यक्तीला लोकप्रतिनिधींनी पात्र मानले त्यास इज्जत एमएसटी मिळत होते.
योजनेत सातत्याने वाढत असलेली गडबड रोखण्यासाठी रेल्वेने इज्जत मासिक सीजन तिकीट योजना गांभिर्याने घेतली आहे.
आता यामध्ये फसवणूक चालणार नाही. (Izzat MST)

 

आता माननीयांच्या दाखल्याची नाही गरज

 

अर्जासह रहिवाशी दाखल्याची झेरॉक्स प्रत सुद्धा लावावी लागेल.
अर्जदारांना मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, विजेचे बिल इत्यादीच्या झेरॉक्स प्रतिनंतर संबंधित एसडीएम,
बीडीओ, किंवा तहसीलदारांकडून सर्व कागदपत्रे प्रमाणित केल्यानंतरच इज्जत एमएसटी जारी केले जाईल.
म्हणजे आता इज्जतसाठी माननीयांच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. (Izzat MST)

 

Web Title : Izzat MST | indian railways izzat monthly ticket irctc

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 966 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Vikram Gokhale | ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचा मुख्यमंत्रिपदाबाबतच्या वादावर मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘…तेव्हा फडणवीस मला चूक झाली म्हणाले होते’

PM Kisan | सर्व शेतकर्‍यांना दरमहिना मिळतील 3000 रुपये, जाणून घ्या काय आहे ही नवीन योजना आणि कसा करावा अर्ज?