Covid-19 : UK तून 811 लोक आले राजस्थानमध्ये, ‘कोरोना’च्या नव्या स्ट्रेनमुळे सरकार ‘अलर्ट’

जयपुर : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने भारतासह सर्व देशांना चिंतेत टाकले आहे. ब्रिटनहून राजस्थानला आलेल्या 811 लोकांची माहिती मिळाल्यानंतर राजस्थान सरकारसुद्धा नव्या स्ट्रेनमुळे अलर्ट झाले आहे. आरोग्य विभागाने सर्व जिल्हा कलेक्टर्सला अलर्ट जारी केला आहे. ब्रिटनहून आलेल्या सर्व प्रवाशांचे मॉनिटरिंग करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले.

कोरोनावर अजून पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नसतानाच ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने जगभरात खळबळ माजवली आहे. हा नवा व्हेरिएंट वेगाने पसरत असल्याने चिंता आणखी वाढली आहे. मात्र, यानंतर यूकेच्या सर्व फ्लाइट्सवर प्रतिबंध लावण्यात आला आहे. परंतु, यापूर्वीच मोठ्या संख्येने प्रवाशी भारतात पोहचले आहेत. 24 डिसेंबरपर्यंत यूकेहून राजस्थानमध्ये एकुण 811 प्रवाशी पोहचले आहेत. या गोष्टीची माहिती मिळताच राजस्थान सरकार अलर्ट झाले आहे आणि सर्व जिल्हा कलेक्टर्सला नव्या स्ट्रेनबाबत अलर्ट जारी केला आहे.

सुरूवातीच्या माहितीनुसार, यूकेहून राजस्थानला आलेल्या कोणताही प्रवाशी पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त समोर आलेले नाही. तरीही खबरदारी म्हणून काळजी घेतली जात आहे. आरोग्य विभागाकडून जारी अलर्टमध्ये सुद्धा जिल्हा कलेक्टर्सला अशा प्रवाशांनी 7 दिवसांसाठी होम आयसोलेट करण्याचे निर्देश दिले आहेत. सोबतच 7 दिवसानंतर पुन्हा एकदा आरटीपीसीआर टेस्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जयपुरमध्ये आले सर्वात जास्त 333 लोक
यूकेहून मागील काही दिवसात राजस्थानमध्ये 811 लोक आले. त्यापैकी जयपूरमध्ये सर्वात जास्त 333 लोक आले. याशिवाय 70 अजमेरमध्ये, 12 भीलवाडामध्ये, 5 टोंकमध्ये, 9 नागौरमध्ये, 2 भरतपुरमध्ये, 4 धौलपुरमध्ये, 13 बीकानेरमध्ये आणि 22 चूरूमध्ये आले आहेत. तर श्रीगंगानगरमध्ये 38, हनुमानगढमध्ये 1, अलवरमध्ये 48, जोधपुरमध्ये 73, दौसामध्ये 4, सीकरमध्ये 9, झुंझुनूमध्ये 24, पालीमध्ये 3, सिरोहीमध्ये 2, जालोरमध्ये 1, जैसलमेरमध्ये 2, बाडमेरमध्ये 7, कोटामध्ये 38, झालावाडमध्ये 4, बूंदीमध्ये 6, उदयपुरमध्ये 43, बासवाडामध्ये 1 आणि राजसमंदमध्ये 35 लोक यूकेतून आले आहेत. या सर्व प्रवाशांवर देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांची टेस्ट निगेटीव्ह आली तरी सुद्धा त्यांना क्वारंटाइन ठेवले जाईल.