Jalgaon ACB Trap | 10 लाख रुपये लाचेची मागणी करणाऱ्या अनुसूचीत जमाती जात पडताळणी समिती कार्यालयातील दोन लिपीक आणि समिती सदस्यांवर एसीबीकडून FIR

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – तक्रारदार यांना स्वतःचे व त्यांच्या मुलीचे जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) मिळणेसाठी प्रकरण सादर केलेले होते. तक्रारदार यांचे व त्यांच्या मुलीचे असे दोन्ही जात वैधता प्रमाणपत्र सदस्य समितीकडून काढून आणुन देण्यासाठी सदस्य समितीतील मेंबरचे नाव सांगून एका प्रमाणपत्राचे प्रत्येकी 5 लाख रुपये प्रमाणे दोन जात वैधता प्रमाणपत्राचे 10 लाख रुपये लाचेची मागणी (Demand Bribe) करणाऱ्या धुळे येथील अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती (Scheduled Tribe Caste Verification Committee) कार्यालयातील दोन कनिष्ठ लिपीक आणि समिती सदस्यावर जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Jalgaon ACB Trap) गुन्हा दाखल केला आहे. जळगाव एसीबीने (Jalgaon ACB Trap) शुक्रवारी (दि.30) तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 

कनिष्ठ लिपीक अनिल पाटील Junior Clerk Anil Patil (वय-५२), राजेश ठाकुर Rajesh Thakur (वय-५२), समिती सदस्य निलेश अहीरे Committee Member Nilesh Ahire (वय-५२) असे गुन्हा (FIR) दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील फेजपुर येथील 52 वर्षीय व्यक्तीने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Jalgaon ACB Trap) तक्रार केली आहे. पथकाने 28 ऑक्टोबर आणि 21 नोव्हेंबर 2022 रोजी पडताळणी केली होती. त्यावेळी आरोपींनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार शुक्रवारी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

तक्रारदार हे अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गातील असून त्यांनी स्वतःचे व त्यांच्या मुलीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी प्रकरण सादर केलेले होते. मागील १९ वर्षापासुन वारंवार सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा करून देखील तक्रारदार यांना त्यांचे स्वतःचे व त्यांच्या मुलीचे जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) येथे रिट पिटीशन दाखल केले होते. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने अनुसूचीत जमाती जात पडताळणी समितीला दोन्ही जात वैधता प्रमाणपत्राचा निकाल देणेसाठी दोन महिन्याचा कालावधी देण्याबाबत निकाल दिला होता. न्यायालयाची प्रत जात पडताळणी समिती कार्यालय धुळे येथे जमा केल्यानंरही या प्रकरणांचा निकाल न दिल्याने तक्रारदार हे कार्यालयातील कनिष्ठ लिपीक अनिल पाटील यांना भेटले.

अनिल पाटील त्यांनी तक्रारदार यांना दुसऱ्या दिवशी बोलावून घेवून तक्रारदार यांचे व त्यांच्या मुलीचे असे दोन्ही जात वैधता प्रमाणपत्र सदस्य समितीकडून काढून आणून देण्यासाठी सदस्य समितीतील मेंबरचे नाव सांगुन एका प्रमाणपत्राचे प्रत्येकी 5 लाख रुपये या प्रमाणे 2 जात वैधता प्रमाणपत्राचे 10 लाख रुपये लाचेची मागणी केली. तसेच समिती सदस्य निलेश अहीरे यांनी तक्रारदार यांचे जात वैधता प्रमाणपत्रचे काम करून देण्यासाठी कनिष्ठ लिपीक राजेश ठाकुर यांना मध्यस्थी करण्यास सांगितले. तसेच त्यांचे मार्फत तक्रारदार यांच्याकडे 8 लाख रुपयाची मागणी केली.

 

हे पैसे ठाकुर यांच्याकडे द्या असे सांगून स्वतःसाठी पैसे स्वीकारण्याची संमती दिली.
तसेच जात वैधता प्रमाणपत्र घेण्यासाठी नंदुरबार कार्यालयातील लिपिक खोसे यांना हजार दोन हजार रुपये देण्याबाबत तक्रारदार यांना प्रोत्साहन दिले.
तसेच ठाकुर यांनी अहीरे यांचे सांगण्यावरून आठ लाख रुपये स्वीकारण्याची संमती दर्शवली. तसेच लाचेच्या मागणीस प्रोत्साहन दिले.
आरोपींविरुद्ध धुळे शहर पोलीस स्टेशन (Dhule City Police Station)
येथे शुक्रवारी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आलेला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे (Addl SP Narayan Nyahalde)
पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाटील (Deputy Superintendent of Police Shashikant Patil),
पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव (Police Inspector Sanjog Bachhav),
जाधव (Police Inspector Jadhav), पोलीस अंमलदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील,
रवी घुगे, अशोक अहिरे, बाळु मराठे, सुनील वानखेडे, ईश्वर धनगर, प्रणेश ठाकूर यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Jalgaon ACB Trap | FIR filed by ACB against two clerks and committee members in the Schedule Tribe Caste Verification Committee office for demanding a bribe of Rs 10 lakh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

CM Eknath Shinde | उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध एकनाथ शिंदेंची टोलेबाजी, अधिवेशन समारोपदिनी मुख्यमंत्र्यांची चौफेर फटकेबाजी (व्हिडिओ)

Pune PMC News | पुणे मनपा अभियंता संघाच्या 2023 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

Devendra Fadnavis | उपमुख्यमंत्री खोटे बोलले, वीज तोडल्या प्रकरणी शेतकऱ्याची थेट फडणवीसांविरुद्ध पोलिसांत तक्रार