Jalgaon Crime | अत्याचार झालेल्या पीडित चिमुकलीनं कोर्टात सांगितला घडलेला प्रसंग; न्यायालयाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Jalgaon Crime | अनेक अत्याचाराच्या धक्कादायक घटना अधिक समोर येताना दिसत आहेत. त्यातच अल्पवयीन मुलीवरही अत्याचाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यातच एका बलात्कार (Rape) पीडित 7 वर्षीय चिमुकलीने न्यायालयात एक मोठं धाडस दाखवलं आहे. न्यायालयात तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा तिने चक्क पाढाच वाचला आहे. यामुळे कोर्टाने तिचं म्हणंनं ऐकूण घेऊन एक महत्वपुर्ण निर्वाळा केला आहे. न्यायालयाने त्या नराधम आरोपीला थेट जन्मठेपेची शिक्षा (Jalgaon Crime) सुनावली आहे.

अधिक माहितीनूसार, ही घटना जळगाव (Jalgaon Crime) जिल्ह्यातील धरणगावमधील आहे. 24 जून 2016 रोजी दुपारी अडीचच्या सुमारास पीडित मुलगी आपल्या घराच्या जवळ शेतात शौचासाठी गेली होती. दरम्यान, नराधम आरोपी जावेद सलीम शेख (Javed Salim Sheikh) याची तिच्यावर नजर पडली. यानंतर आरोपीने तिच्या मागे जाऊन तिच्यावर जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार केला. या घटनेने खळखळ उडाली होती, यानंतर पोलिसांना त्याला अटक करुन त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती.

याप्रकरणी न्यायालयाने साक्षी आणि पुराव्याअंती नराधमाला पाच वर्षे सश्रम कारावास आणि बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याअंतर्गत 7 वर्षे सश्रम कारावास तसेच एम-5 अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
हा महत्वपुर्ण निकाल अतिरिक्त न्यायाधीश डी. एन. खडसे (Additional Judge d. N. Khadse) यांनी दिला आहे. मागील 5 वर्ष न्यायालयीन लढा दिल्यानंतर हा निकाल देण्यात आला आहे.
दरम्यान, महिला सरकारी वकील चारुलता बोरसे (Lawyer Charulata Borse) यांनी 7 वर्षीय पीडित मुलीला विश्वासात घेऊन कोर्टात बोलतं केलं.
महिला वकीलाने मुलीला धीर दिल्याने पीडितेनं तिच्यावर घडलेल्या अत्याचाराचा प्रसंग घडाघडा न्यायालयात सांगितला.
त्यानंतर न्यायालयाने महत्वपुर्ण निर्वाळा केला आहे.

हे देखील वाचा

MLA Sharad Ranpise | काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार शरद रणपिसे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Jalgaon Crime | court sentenced life imprisonment to minor girl rape convict

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update