Jalgaon Crime News | प्रेमसंबंध ठेव नाहीतर आत्महत्या करेन; तरुणाच्या धमकीने तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon Crime News) रामानंद नगर परिसरातील एका तरुणीने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. शनिवारी तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. या तरुणीने आरोपी तरुणाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. हा आरोपी तरुण माझ्याशी प्रेमसंबंध (Love Affair) ठेवले नाही तर मी आत्महत्या करून घेईल आणि तुमच्या कुटुंबाला त्यामध्ये अडकवेन अशी धमकी देत होता. आरोपीच्या या जाचाला कंटाळून अखेर तरुणीने टोकाचा निर्णय घेत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अक्षय रामचंद्र सुरवाडे (रा. पिंप्राळा) (Akshay Ramachandra Surwade) या तरुणाच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?
जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या (Ramanandnagar Police Station) हद्दीत या मृत तरुणीचे अक्षय सुरवाडे या तरूणाशी प्रेमसंबंध होते. या प्रेम संबंधाची माहिती तरुणीच्या आईला लागली. यानंतर मुलीच्या आईने मुलीची समजूत घातली व या पुढे तरुणापासून दूर राहायचे असे सांगितले. तसेच त्या तरुणालादेखील मुलीच्या आईने यापुढे फोन करायचा नाही किंवा भेटायचं नाही, कुठलाच संपर्क ठेवायचा नाही असे बजावले होते.

मात्र आरोपी तरुण हा मृत तरुणीला मोबाइलवर फोन करून तसेच प्रत्यक्ष भेटून प्रेमसंबंध ठेव नाही तर मी आत्महत्या
करून घेईल आणि तुझ्या घरच्यांना सुध्दा मारून टाकेल, अशा धमक्या (Threat) देत होता.
मात्र तरुणीने या सगळ्याला विरोध केला. यानंतर त्याने मृत तरुणीच्या मोठ्या बहिणीला सुध्दा व्हॉट्सअपवर
मेसेज पाठवून तुझ्या बहिणीला माझ्याशी बोलायला सांग नाहीतर तुम्हाला सर्वांना पाहून घेईल, अशी धमकी दिली.
अखेर या सगळ्या त्रासाला कंटाळून तरुणीच्या आईने 6 मार्च रोजी पोलिसात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.
तरी देखील आरोपीचे तिला त्रास देणे सुरूच होते. अखेर या सगळ्याला वैतागून तरुणीने शनिवारी सकाळी 11
वाजता घरात कुणीही नसताना टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. यानंतर मृत तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून रविवार दुपारी पोलिसांनी अक्षय सुरवाडे याच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा (Crime) दाखल करून त्याला अटक केली आहे.

Web Title : Jalgaon Crime News | have affair with me or threats to commit suicide young woman ended her life in spite of the trouble

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | संजय गायकवाडांच्या शासकीय कर्मचाऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन अजित पवार संतप्त, म्हणाले- ‘…तर राज्य चालवणं कठीण होईल’ (व्हिडिओ)

Popatrao Gawade | राष्ट्रवादीचे माजी आमदार, शरद पवारांचे निकटवर्तीय पोपटराव गावडे रूबी हॉलमध्ये दाखल, उपचार सुरू

Pune Crime Suicide News | भाजप नेत्याच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलीची पुण्यात आत्महत्या