Jalgaon Crime News | जंगलात सापडला पोत्यात बांधलेला मृतदेह; जळगाव जिल्ह्यात खळबळ

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Jalgaon Crime News | जंगलात पोत्यात कोंबलेल्या स्थितीत मृतदेह (Dead Body) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कुजलेल्या स्थितीतील मृतदेह असून संबंधित व्यक्तीची हत्या (Murder) करुन मृतदेह पोत्यात कोंबून जंगलात फेकून दिल्याचे चौकशीत समोर आले आहे. ही घटना (Jalgaon Crime News) जामनेर तालुक्यातील लहासर परिसरात घडली. दरम्यान, मृत महिला की पुरूष हे समोर आलेले नाही.

या प्रकरणी पोलिसांनीच स्वत: फिर्यादी होवून खुनाचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. जामनेर बोदवड रोडवरील (Jamner Bodwad Road) लहासर जंगलात (Lhasaar Forest) सोमवारी दुपारी पोत्यात बांधलेल्या प्रौढाचा मृतदेह (Jalgaon Crime News) आढळल्याचे समोर आले. लहासर शिवारातील जंगलात दुपारी दीड वाजेच्या सुमारास गुराखी गुरे चारत होता. यावेळी तेथे त्याला दुर्गंधी आली. त्याने आजूबाजूला पाहिले असता एका पोत्यातूनच ही दुर्गंधी येत असल्याचे त्याच्या लक्षात आले. हा प्रकार त्याने गावात सांगितला. त्यानंतर पोलिसांशी (Jamner Police) संपर्क साधला. त्यानंतर जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे (Police Inspector Kiran Shinde) यांनी सहकाऱ्यांसोबत तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

मयत प्रौढाचे हात-पाय बांधून पोत्यात भरून ठेवल्याचे तपासणीत तसेच पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे.
साधारण एक महिन्यापूर्वी संबंधिताचा खून केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मारेकऱ्यांनी खून (Murder Case) करुन मृतदेह पोत्यात भरुन त्याला जंगलात फेकून त्याची विल्हेवाट लावली असल्याची शक्यता आहे.
घटनास्थळी चाळीसगाव आणि पाचोरा येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली.
याबाबत पोलीस कर्मचारी नीलेश वासुदेव घुगे (Nilesh Vasudev Ghuge) यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात
(Jamner Police Station) गुन्हा नोंद झाला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :  Jalgaon Crime News | jalgaon lahasar forest body was found in sack

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा