Pune BJP News | पुणे भाजप शहराध्यक्षपदी धीरज घाटे तर पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune BJP News | आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजप (Maharashtra BJP) चांगलीच तयारीला लागली असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. याबाबतची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केली. पुणे शहर जिल्हाध्यक्षपदी (Pune City BJP President) धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी (Pimpri Chinchwad City BJP President) शंकर जगताप (Shankar Jagtap) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Pune News)

 

 

पुणे ग्रामीण (बारामती) शहराध्यपदी वासुदेव काळे (Vasudev Kale) तर पुणे मावळ शहराध्यपदी शरद बुट्टे पाटील (Sharad Butte Patil) यांची निवड केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून भारतीय जनता पक्ष जिल्हाध्यक्षांची नवी टीम घोषित करण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी जवळपास 70 नावांची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा (Legislative Assembly) आणि लोकसभेच्या (Lok Sabha) दृष्टीकोणातून भाजपची जोरदार तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

 

Web Title :  Pune BJP News | Dheeraj Ghate appointed as Pune BJP City President and
Shankar Jagtap as Pimpri Chinchwad City President

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा