Jalna Crime News | हिंगोलीतील जवानाचा गावी परतताना रेल्वेतून पडून मृत्यू; लेकीला पाहण्याची इच्छा राहिली अपूर्ण

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – Jalna Crime News | नुकत्याच जन्माला आलेल्या आपल्या लेकीला पाहण्यासाठी सुट्टी घेऊन घरी जात असताना भारतीय सैन्यदलातील (Indian Army) एका जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जालन्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे. ते नुकत्याच जन्माला आलेल्या आपल्या लेकीला पाहण्यासाठी गावाकडे परतत होते. राहुल ढगे असे या मृत जवानाचे नाव आहे. आपल्या लेकीला डोळे भरून पाहण्याआधीच काळाने त्यांचा घात केला. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. (Jalna Crime News)
काय आहे संपूर्ण प्रकरण?
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेल्या पळशी या गावचे रहिवाशी राहुल मारुती ढगे हे 20 मार्च 2013 ला महार रेजिमेंटमध्ये सैन्य दलात भरती झाले होते. सोमवारी पहाटे सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास त्यांचा रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झाला. जवान राहुल ढगे हे रात्री एक वाजताच्या सुमारास औरंगाबाद- पूर्णा या रेल्वेने पूर्णा येथे जात होते. त्यावेळी जालना शहारा जवळील लोंढेवाडी ते सारवाडीच्या दरम्यान ते रेल्वेतून खाली पडले. काल सकाळी 9 वाजताच्या सुमारास रेल्वेचे कर्मचारी गस्त घालत असताना अशोककुमार काळूराम वर्मा यांना ते मृत अवस्थेत आढळून आले. यानंतर त्यांनी तातडीने याची माहिती तालुका जालना पोलिसांना दिली. (Jalna Crime News)
यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अकस्मात मृत्यूची नोंद करून मारुती ढगे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठविला.
राहुल ढगे यांना 20 मार्च रोजी सैन्य दलात भरती होऊन दहा वर्षे पूर्ण होणार होती.
16 जुलै रोजी त्यांची बदली नगर येथे सातव्या महार बटालियनमध्ये झाली होती.
त्यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी, दोन भाऊ, तीन बहिणी असा मोठा परिवार आहे.
यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
वसमत तालुक्यातील पळशी या मूळ गावी राहुल यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Web Title :- Jalna Crime News | indian army jawan rahul dhage died in railway accident while returing to home to see his new born baby in hingoli maharashtra
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime News | संकष्टी चतुर्थीला ‘दगडुशेठ’जवळ ‘वसुली’चा प्रयत्न करणारा पोलीस कर्मचारी निलंबित