महापालिकेच्या समोरील रस्त्यावर वाहनांना ‘जॅमर’

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची पार्किंग व्यवस्था आपुरी असल्याने अनेकजण स्वतःची वाहने मुंबई-पुणे महामार्गावर दुतर्फा लावतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे पिंपरी वाहतूक पोलिसांनी गुरुवारी दुपारी रस्त्याच्या दुतर्फा उभा असणाऱ्या चार चाकी वाहनांच्या चाकांना जॅमर लावले. या वाहन धारकांकडून दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.
[amazon_link asins=’B071JB2WJX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c2575a17-8a88-11e8-9e4e-9beb45114d03′]

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या परिसरात वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब असते. यामध्ये बेशिस्त वाहन चालकांच्या चुकीच्या पध्द्तीने रस्त्यात हव्या त्या ठिकाणी वाहने लावण्याची पध्द्त कारणीभूत आहे. शहरातील रस्त्यावर पार्किंगचे फलक लावले असताना देखील चालक त्या ठिकाणी बिनधास्त वाहने उभी करतात. तर वाहतूक पोलिसही याकडे कारवाई करण्यास काना डोळा करतात. त्यामुळे वाहन चालकांचे फोफावते.

पालिकेत येणारी वाहने ही जास्त करून राजकीय पदाधिकारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची असतात. त्यामुळे शक्यतो वाहतूक पोलीस अशा वाहनांवर कारवाई करण्याचे टाळतात. मात्र नुकतेच नवी मुंबई येथून पुण्यात, पिंपरी वाहतूक शाखेत दाखल झालेले सहायक निरीक्षक संतोष पाटील यांनी कारवाईचा बडगा उचलला. पालिकेच्या समोरील रस्त्याच्या दुतर्फा उभा असणाऱ्या वाहनांच्या चाकांना जॅमर लावण्यात आले आहेत. नो पार्किंगमध्ये वाहने उभा केल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
[amazon_link asins=’B079QR93GM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d216e0ea-8a88-11e8-8374-9368e66a0baf’]