सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये चकमक ; एका दहशतवाद्याला कंठस्नान 

श्रीनगर : वृत्तसंस्था – पुलवामा हल्ल्यांनंतरही सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. जम्मू-काश्मीरमधील सोपोर येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले आहे. चकमकीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच स्थानिकांकडून चकमकीदरम्यान होणारा विरोध टाळण्यासाठी परिसरात गुरुवारी रात्रीपासूनच जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांनी ‘सर्च ऑपरेशन’ सुरू केलं आहे.उत्तर काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली,लष्करी जवानांनी त्या भागात शोध मोहीम राबवली असून दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरू आहे.या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे.
गेल्या आठवड्यात सीआरपीएफच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्यानंतर ही दुसरी चकमक आहे.यापूर्वी पुलवामा जिल्ह्यात सोमवारी १६ तास झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ‘जैश ए मोहम्मद’च्या कमांडरसह तीन दहशतवाद्यांना ठार केले. पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांनी तपास अभियान सुरू केलं आहे.