जम्मू आणि काश्मीर उच्चन्यायालयात ‘भरती’, पहिल्यांदाच सर्व भारतीयांना अर्ज करण्याची ‘संधी’

श्रीनगर : वृत्तसंस्था – केंद्रातील मोदी सरकारने जम्मू आणि काश्मीरमध्ये 370 कलम हटवल्यानंतर देशातील सर्वच राज्यातील नागरिक तेथे नोकरीसाठी पात्र ठरत आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने राज्याबाहेरील उमेदवारांना नोकरीची दारे खुली केली आहेत. न्यायालयाने 33 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून, याकरिता देशभरातील पात्र उमेदवार अर्ज करु शकणार आहेत.

पहिल्यांदाच राज्याबाहेरील उमेदवारांना संधी
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याच्या दर्जा बहाल करणारे कलम 370 रद्द करुन जम्मू-काश्मीर व लडाखला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आला आहे. त्यानंतर पहिल्यांदाच राज्याबाहेरील उमेदवारांना येथे नोकरीची संधी देण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे महानिबंधक संजय धार यांनी 26 डिसेंबरला रोजी न्यायालयातील नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी उमेदवारांना 31 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज करावा लागणार आहे.

केंद्र सरकारच्या नोकरीसाठी अर्ज करु शकतात
यापूर्वी भारतीय नागरिकांना म्हणजे इतर जम्मू आणि काश्मीर वगळता इतर राज्यातील जम्मू आणि काश्मीरमध्ये नोकरीसाठी अर्ज करता येत नव्हता. केवळ भारतीय लोकसेवा आयोगातीलच लोकांची पोस्टिंग या ठिकाणी होत होती. मात्र, आता देशातील नागरिक या ठिकाणी केंद्र सरकारच्या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/