सर्च ऑपरेशनमध्ये झालेल्या चकमकित ४ दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू काश्मीर : वृत्तसंस्था – जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये मोठी चकमक झाली. पुलवामा येथील हाजीन राजपोरा परिसरात २-३ दहशदवादी दबा धरून बसल्याची माहिती पोलिस आणि सुरक्षा जवानांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शुक्रवारी रात्री उशीरा सुरक्षा रक्षकांनी सर्च ऑपरेशन सुरू केले होते. शोध सुरू असतानाच अचानक सैनिकांवर गोळीबार सुरु  झाला.आणि धुमश्चक्री उडाली. ही चकमक अद्यापही सुरू असून सध्या ४ दहशदवाद्यांचा खात्मा करण्यात जवाणांना यश आले आहे.

 

या पूर्वी  शुक्रवारी देखील पुलवामा येथे सुरक्षा दल आणि दहशदवादी यांच्यात चकमक झाली होती. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील अवंतिपुरा येथील बंदरपूरा परिसरात दहशदवादी लपले असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली होती. त्यानंतर सुरक्षा रक्षककांनी शोध मोहीम हाती घेतली. शोध मोहिमे दरम्यान परिसरास घेरले असता अचानक दहशदवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला.
जवानांनी 4 दहशतवाद्यांचा खात्मा करून केला दारुगोळा जप्त
 

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा येथील एका घरात जैश ए-मोहम्मदचे दहशतवादी लपले होते. जवानांनी त्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले परंतु त्यांनी उलट फायरिंग सुरु केल्याने. जवानांनी देखील प्रतिउत्तर देण्यासाठी फायरिंग सुरु केली. त्यापैकी रात्री 2 आणि सकाळी दोन असे 4 दहशतवादी मारले गेले. या दहशतवाद्यांकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे.