का तुटलं जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरचं नातं ? ‘हे’ आहे कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांच्या मैत्रीची अनेकदा चर्चा होताना दिसत असते. दोघं एकमेकांसोबत खूप कंफर्टेबल आहेत. जान्हवीनं धडक या आपल्या डेब्यू सिनेमात ईशान खट्टर सोबत काम केलं आहे. अशाही बातम्या समोर येत होत्या की, दोघं एकमेकांना डेट करत आहेत. करणच्या कॉफी विथ करण या शोमध्ये दोघे एकत्र दिसले होते.

या शोमध्य ईशाननं जान्हवीची माफी मागितली होती. अर्जुन कपूरनं ईशान आणि जान्हवीच्या नात्यावरून कमेंट केली होती. या कमेंटनंतर शाहिदनं तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली होती. याच गोष्टीवरून ईशाननं जान्हवीची माफी मागितली होती. अनेक रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं होतं की, दोघं सिक्रेट रिलेशनशिपमध्ये आहेत. परंतु ताज्या रिपोर्टनुसार मात्र जान्हवी आणि ईशान यांचे मार्ग वेगवेगळे आहेत. असं म्हटलं जात आहे की याबाबतीत जान्हवीनं पुढाकार घेतला आहे.

एक रिपोर्टमध्ये सोर्सनं सांगितलं होतं की, हे दोन महत्त्वाकांक्षी लोकं आहेत ज्यांना प्रेमाऐवजी करिअरवर फोकस करायला पाहिजे. बस एवढीच गोष्ट आहे. ईशान जान्हवीला जरा जास्तच अटेंशन देत होता. दोघं जेव्हा धडक सिनेमा प्रमोट करत होते तेव्हा सर्वकाही ठिक होतं. परंतु जेव्हा जान्हवी आपला सिनेमा घोस्ट स्टोरीज प्रमोट करत होती तेव्हा ईशान अनेकदा व्हेन्यूवर यायचा ज्यामुळे जान्हवीला अ‍ॅम्बेरेसिंग वाटायचं.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर जान्हवी गुंजन सक्सेना या आगामी सिनेमात दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे रुही आफ्जा हा सिनेमादेखील आहे. या सिनेमात ती राजकुमार रावसोबत काम करताना दिसणार आहे. याशिवाय ईशान खाली पीली या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अनन्या पांडे काम करताना दिसेल.