#Video : म्हणून रस्त्यावर चालत होती जान्हवी कपूर, पाहून चाहते झाले चकित…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बहुतेकदा असे दिसून येते की बॉलीवूड अ‍ॅक्टरेसला खूप मोठी सेक्युरिटी असते, मोठ्या गाड्यांमध्ये फिरतांना दिसून येता. जर एखादी अ‍ॅक्टरेस आणि ती पण स्टारकीड रस्त्यावर सर्वसामान्य लोकांसारखी चालतांना दिसली तर काय होणार ? असचं काहीतरी जान्हवी कपूर सोबत घडलं जेव्हा ती पाई चालत होती आणि तिला बघितल्यावर लोक परेशान झाले होते.

बॉलीवूडमधील चर्चित स्टार अ‍ॅक्टरेस जान्हवी कपूर सामान्य लोकांसारखी रस्त्यावर चालतांना दिसून आली आहे आणि जान्हवी आपल्या जिमच्या रस्त्यावर चालतांना दिसते आहे. हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे. मुंबईच्या रस्त्यावर पाई फिरतांना दिसते आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी ब्लॅक कलरच्या जिम आऊटफिट मध्ये खूप सुंदर दिसते आहे. या व्हिडीओ मधून असे दिसून येत होते की या रस्त्यावर गाडी येण्यास अडचण येत असेल म्हणून ती गाडीतून उतरून पाई चालत आली असावी.

बॉलीवूड मध्ये चित्रपट ‘धड़क’ पासून एन्ट्री करणारी न्यूकमर अ‍ॅक्टरेस जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंग मध्ये व्यस्त आहे. जान्हवी IAF पायलट गुंजन सक्सेना यांच्यावरील बायोपिक मध्ये मुख्य भूमिका करणार आहे. हा चित्रपट पुढच्यावर्षी २४ मे ला प्रदर्शित केला जाणार आहे.

Loading...
You might also like