जान्हवी कपूर ‘या’ 2 बॉलिवूड अभिनेत्यांना देणार Kiss करण्याची संधी ! सांगितलं ‘गुपित’

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार जान्हवी कपूर बहिण खुशी कपूरसोबत एका मुलाखतीत आली होती. यावेळी तिनं अनेक प्रश्नांना बिंधास्त उत्तरे दिली. तिनं यचाही खुलासा केला आहे की, तिला जर किस करायला संधी मिळाली तर ती कोणाला किस करेल.

एका इंग्रजी वेबासाईटला दिलेल्या मुलखातीत जान्हवीला विचारण्यात आलं की, जर तिला संधी मिळाली तर बॉलिवूड स्टार विकी कौशल आणि कार्तिक आर्यन यांच्यापैकी कोणाला किस करशील.

यावर उत्तर देताना जान्हवी कपूरनं क्षणाचाही विलंब न लावता विकी कौशलच्या नावाची निवड केली. अशात एका चॅट शोमध्ये जान्हवी कपूरनं कार्तिक आर्यनला डेट करण्याबद्दल इच्छा व्यक्त केली होती.

जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच ती घोस्ट स्टोरीज या वेब सीरीजमध्येही ती दिसली होती. लवकरच जान्हवी दोस्ताना 2 सिनेमात दिसणार आहे. याशिवाय ती रुही आफ्जा या रोमँटीक हॉरर सिनेमातही दिसेल. इतकेच नाही तर तर गुंजन सक्सेनाचा बायोपिक असेलल्या गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल या सिनेमातीही ती काम करणार आहे. याशिवाय तिच्याकडे तख्त हा सिनेमादेखील आहे. या सिनेमात जान्हवी विकी कौशलसोबत काम करताना दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/B8S3pJPAKNx/