Jasmin Bhasin | ‘बिग बॉस’फेम जस्मिन भसीनने कास्टिंग काऊच बाबत केला ‘हा’ धक्कादायक खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन : छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे जस्मिन भसीन (Jasmin Bhasin). जस्मिनने अनेक रियालिटी शो आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाचे ठसे उमटवले होते. जस्मिनने आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वतःची अशी एक वेगळी जागा निर्माण केली होती. जस्मिन बिग बॉस मध्ये देखील दिसून आली होती. आज जस्मिन (Jasmin Bhasin) विषयी जाणून घेऊयात एक धक्कादायक घटना जी तिने स्वतः सांगितली आहे.

जस्मिनला सर्वात जास्त प्रसिद्धी बिग बॉस नंतर मिळाली होती. त्यानंतर तिला अनेक प्रोजेक्ट देखील मिळाले होते. सुरुवातीच्या काळात जस्मिनने सिनेसृष्टीत पदार्पण करण्याआधी अनेक ठिकाणी मुलाखत देखील दिली होती. तिला या क्षेत्रात काम करण्याची फारच इच्छा होती. एका मुलाखतीत जस्मिनने कास्टिंग काऊच बद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. यावेळेस ती म्हणाली होती एका मुलाखतीमध्ये मी गेले असता दिग्दर्शकाचे माझ्यासोबत बोलणे चालू होते. आणि मला त्याच्या बोलण्याचा अंदाज येऊ लागला. त्यानंतर त्यांनी मला कपडे काढण्यास सांगितले दिग्दर्शकाला मला बिकनी मध्ये पहायचे होते. मात्र मी धाडसपणे त्या मुलाखतीतून बाहेर पडले. जस्मिनच्या या खुलासाने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

जस्मिनने आजवर छोट्या पडद्यावर अनेक मालिकांमध्ये काम केले. याव्यतिरिक्त ती अनेक रियालिटी शोमध्ये देखील दिसून आली होती. बिग बॉसच्या घरात जस्मिनच्या खेळीने तिने प्रेक्षकांची मन जिंकली होती. जस्मिनच्या (Jasmin Bhasin) खाजगी आयुष्यातील गोष्टी देखील जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. सोशल मीडियावर जस्मिनचे अनेक फॉलोवर्स देखील आहेत.

Web Title :-Jasmin Bhasin | bigg boss fame jasmin bhasin revealed her casting couch insident in some years back

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra MLC Election Results | ‘सत्यजीत तांबे जिंकले तरीही तो भाजपचा विजय नसेल…;’ – जयंत पाटील

Pune Crime News | ‘आरोपी पकडा अन् बक्षीस मिळवा’, कोयता गँगच्या दहशतीमुळे पुणे पोलिसांची अनोखी योजना

Maharashtra MLC Election Results | सत्यजीत तांबे भाजपमध्ये जाणार नाहीत…; मंत्री दीपक केसरकरांनी सांगितले कारण