होय, जसप्रीत बुमराहची पत्नी ‘पुणेकर’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह पुण्याच्या स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशन बंधनात अडकला. सोमवारी गोव्यात मोजक्याच नातेवाईकांच्या साक्षीने जसप्रीत आणि संजनाचे लग्न झाले. जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांनी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट केले असून त्या खाली असे म्हंटले आहे की, खरं प्रेम असेल मार्ग दाखवतं, आजचा दिवस माझ्यासाठी आनंदाचा आहे. आम्ही दोघे नव्या प्रवासाला सुरुवात करत आहोंत हि बातमी तुमच्या सोबत तुमच्यासोबत वाटताना आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. हा आनंद तुमच्याशिवाय अपूरा आहे.

संजना हिचा जन्म पुण्यातील आहे. सिम्बॉससिस इंस्टीट्युटमधून तिनं बी टेकचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यात तिने गोल्ड मेडलही पटकावलं आहे. त्यानंतर २०१३-१४मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरींग केलं. संजना ही मॉडल आणि अँकरही आहे. तीने स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत स्पोर्ट्स प्रेझेंटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल आदी अनेक स्पर्धांचे अँकरींग केले आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघाची संजना ही स्पोर्ट्स अँकर आहे. इंडियन प्रीमिअर लीग ( IPL) दरम्यान संजना आणि जसप्रीत यांची पहिली भेट. त्यानंतर ते दोघे चांगले मित्र झाले, या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. जानेवारी २०२०मध्ये दोघांनीही ‘Naman’ या पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती आणि त्यावेळचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

स्पोर्ट्स प्रेझेंटर बनण्यापूर्वी संजनानं

२०१२मध्ये संजनाने फेमिना स्टाईल दिवा फॅशन शो त्यानंतर २०१३मध्ये फेमिना मिस इंडिया पुणे यात सहभाग घेतला होता. त्याच वर्षी तिनं फेमिना ऑफिशिअली गॉर्जिअस कॉम्पिटिशन मध्ये सहभाग घेतला. टेलेव्हिजनवर MTV Splitsvilla 7 च्या माध्यमातून संजनाने पदार्पण केलं होतं, परंतु तिला दुखापतीमुळे ही मालिका सोडावी लागली.