javelin throw | 7 ऑगस्टला देशभरात दरवर्षी होईल भालाफेक स्पर्धा, अ‍ॅथलेटिक्स संघाने केली घोषणा

नवी दिल्ली : javelin throw | भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघाने एक मोठी घोषणा करून (announced) म्हटले आहे की, पुढील वर्षापासून देशातील प्रत्येक जिल्ह्यात 7 ऑगस्टला भालाफेक स्पर्धेचे आयोजन केले जाईल (javelin throw competition will be held on August 7 in every district). अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताला ऑलम्पिकमध्ये पहिले गोल्ड जिंकून देणारा भालाफेक खेळाडू नीरज चोपडाच्या सन्मानार्थ (in honor of Neeraj Chopra) हा निर्णय घेण्यात आला आहे. टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympic) मध्ये 7 ऑगस्टलाच नीरज चोपडाने गोल्ड मेडल (gold medal) जिंकून इतिहास रचला होता.

भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघाने नीरज चोपडासह त्या सर्व खेळाडूंचा सन्मान केला, ज्यांनी टोकियो ऑलम्पिकमध्ये अ‍ॅथलेटिक्समध्ये चांगले प्रदर्शन केले. दिल्लीत आयोजित झालेल्या अ‍ॅथलेटिक्स संघाच्या या कार्यक्रमात थाळीफेक खेळाडू कमलप्रीत कौर, ललित भनोत, सुवर्णपदक विजेता नीरज चोपडा आणि माजी अ‍ॅथलीट अंजू बाबी जॉर्ज सहभागी झाले होते. या दरम्यान दरवर्षी होणार्‍या भालाफेक स्पर्धेची घोषणा सुद्धा करण्यात आली.

तर, ऑलम्पिक गोल्ड मेडलिस्ट नीरज चोपडाने सांगितले की, नॅशनल खेळल्यानंतर जेव्हा मला नॅशनल कॅम्पमध्ये घेण्यात आले तेव्हा त्याचा फायदा मला झाला, कारण अगोदर आम्ही स्वता जेवण बनवत होतो आणि कॅम्पमध्ये सर्वकाही चांगले मिळू लागले. त्यानंतर सर्व बदलत गेले.

टोकियो ऑलम्पिकमध्ये मिळालेल्या गोल्ड मेडलबाबत बोलताना नीरज म्हणाला, जेव्हा मी गोल्ड मेडल जिंकले तेव्हा वाटले की मी हे कसे काय केले. विश्वास बसत नव्हता. मग मी गोल्ड मेडलकडे बघायचो आणि म्हणायचो हे तर तुझ्याकडेच आहे. तो पुढे म्हणाला, आता आमचे लक्ष्य वर्ल्ड चॅम्पियनशिपचे पदक जिंकण्याचे आहे, जे आपल्यासाठी अ‍ॅथलेटिक्समध्ये अंजू बाबी जॉर्ज यांनी जिंकले आहे. एक पदक मिळाल्यानंतर थांबू नये. मी आता आणखी पदक जिंकण्याचा प्रयत्न करेन.

टोकियोमध्ये आपल्या स्पर्धेतील शेवटच्या थ्रोबाबत नीरज म्हणाला, सुरुवातीला दोन थ्रो खुप चांगले गेले. नंतर मध्येच अनेक थ्रो खराब गेले. शेवटच्या थ्रो पूर्वी मला समजले होते की, मी सुवर्ण पदक जिंकले आहे. खुप तल्लीन होतो, परंतु त्या थ्रोपूर्वी मला काहीच समजत नव्हते आणि मी बस थ्रो केला, परंतु हा थ्रो चांगला ठरला.

Murder in Alandi | तरुणाचे हात-पाय बांधून फेकले इंद्रायणी नदीत, खून प्रकरणात FIR

त्याने पुढे म्हटले, कोच हान यांच्यासोबत खुप काम केले, मी त्यांचा आदर करतो. मात्र, त्यांच्या
तंत्रापेक्षा मला कोच क्लॉज यांचे तंत्र चांगले वाटले, यासाठी मी क्लॉज यांच्यासोबत ट्रेनिंग करण्याचा
निर्णय घेतला. ते खुप अनुभवी आहे, ज्याचा फायदा मला मिळाला. तर, डोप टेस्टबाबत त्याने
सांगितले की, डोप टेस्ट तर होतेच. जेव्हा स्वीडनहून टोकियो गेलो तेव्हा सतत तीन दिवस सकाळी
लवकरच डोप टेस्ट घेतली गेली तेव्हा थोडी अस्वस्थता आली.

नीरज म्हणाला, माझी 90 मीटर थ्रो फेकण्याची तयारी यावेळी होती. जेवलिन थोडे टेक्निकल आहे.
मी त्याच्या जवळपास होता. यावेळी विचार केला होता की हे साध्य करणार. 90 मीटर थ्रो करणे
माझे स्वप्न आहे, जे मी पूर्ण करेन. जेवलिन थ्रो डे बाबत तो म्हणाला, 7 ऑगस्टला अ‍ॅथलेटिक्स
फेडरेशन जेवलिन थ्रो डे साजरा करणार आहे. हे ऐतिहासिक आहे की संघाने माझा सन्मान
करण्यासाठी ही पद्धत अवलंबली. मी अतिशय आनंदी आहे.

हे देखील वाचा

Pimpri Crime | भांडणं सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसालाच लगावली कानाखाली, एकाला अटक

Ujjwala Yojana | उज्ज्वला योजना 2.0 : जाणून घ्या कशी लाभदायक आहे ही सरकारी योजना आणि तुम्ही कसा घेऊ शकता लाभ

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update