पाकचा जळफळाट सुरूच, शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार, एक जवान शहीद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने जम्मू काश्मीर बाबत ३७० कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानची चांगलीच घाबरगुंडी झाली आहे. पाकिस्तानने आतापर्यंत केलेले भारताविरोधात सर्वच प्रयत्न फसलेले आहेत. पाकिस्तानला भारताविरोधात मदत करण्यासाठी इतर कोणताही देश तयार होत नाहीये. इकडे जम्मू काश्मीरमधील स्थिती पुन्हा पूर्वपदावर येऊ लागली आहे.

सर्व प्रयत्न निष्फळ होत असल्यामुळे पाकिस्तानचा जळफळाट होत आहे. यामुळेच शनिवारी पुन्हा एकदा पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला आहे. शनिवारी सकाळी राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरममध्ये भारतीय चौक्यांना पाककडून लक्ष्य करण्यात आले. पाकने गोळीबारासह उखळी तोफांचा मारा केला. सीमेपलीकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचा जवान शहीद झाला आहे. लान्स नाईक संदीप थापा असे जवानाचे नाव आहे.

या आधीही स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पाकड्यांच्या गोळीबार केला होता. कृष्णा घाटी सेक्टरमधील सीमेनजीक असलेल्या गावांना पाक लष्कराकडून निशाणा बनवण्यात आले होते.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like