Jawan Movie | नयनताराच्या पतीने दिली जवान चित्रपटाबाबत मोठी अपडेट; बायकोचे कौतुक करताना दिला स्पॉइलर

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडचा किंग खान शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) आगामी चित्रपटासाठी प्रेक्षक प्रचंड उत्साहित दिसत आहे. ‘जवान’ चित्रपटाचा प्रिव्ह्यु (jawan Movie Preview) प्रदर्शित झाल्यानंतर तर सर्वत्र फक्त ‘जवान’ (Jawan) चित्रपटाचीच चर्चा आहे. यामध्ये शाहरुख सोबत दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. चित्रपटाच्या टीझरचे सर्वत्र कौतुक होत असून नयनताराचा नवरा विग्नेश शिवन (Vignesh Shivan) याने देखील जवान चित्रपटाचे कौतुक केले आहे. मात्र बायकोच्या कौतुकामध्ये नयनताराच्या नवऱ्याने चित्रपटाबद्दल अपडेट दिली आहे. ट्वीट करताना विग्नेशने सांगितले आहे की ‘जवान’ (Jawan Movie) चित्रपटामध्ये शाहरुख खान व नयनतारा यांचे रोमांस (SRK And Nayantara Romance) बघण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

 

 

 

 

जवान चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर मनोरंजन विश्वातील अनेकांनी जवानच्या टीमचे कौतुक केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरचा चित्रपट असल्याची चाहूल टीझर बघून येत आहे असे अनेकांनी मत मांडले आहे. सलमानने (Salman Khan) देखील किंग खानच्या (King Khan Of Bollywood) चित्रपटाचे कौतुक केले. यामध्ये अभिनेत्री नयनतारा ही महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार असल्याने तिचा पती विग्नेश शिवन (Vignesh Shivan Tweet) याने इंस्टाग्रामवर जवानचा टीझर स्टोरीला शेअर करत लिहिले की, “आपण एटीली वर का गर्व करु नये, एवढ्या जबरदस्त फिल्ममधून ते बॉलीवुडमध्ये पदार्पण करत आहेत. चित्रपट एकदम इंटरनॅशल दिसत आहे. चित्रपटासाठी खूप एफर्ट, धैर्य व मेहनत घेतली आहे. माझ्याकडून तुम्हांला घट्ट मिठी. नयनतारा तुला खूप शुभेच्छा, यामध्ये तू हॉट दिसत आहेस. शाहरुख खान सोबत तुझे हे पदार्पण हे तुझं स्वप्न आहे.” अशा शब्दांत अभिनेत्री नयनताराचा पती विग्नेशने कौतुक केले. यानंतर शाहरुख खानने या स्टोरीचा स्क्रीनशॉट शेअर करत धन्यवाद मानले.

 

 

 

 

शाहरुखने विग्नेशच्या स्टोरीचा स्क्रीनशॉट ट्वीट करत धन्यवाद मानले. शाहरुखने लिहिले की,
“विग्नेश शिवन तुमच्या प्रेमासाठी खूप धन्यवाद. नयनतारा कमाल आहे.
मी पण हे कोणाला सांगतोय…तुम्ही तर पहिल्या पासूनच ही गोष्ट जाणता.
यापुढे सावध रहा कारण तिने आता काही मेजर किक व पंच शिकून घेतल्या आहेत.”
किंग खानच्या या मजेशीर ट्वीटला विग्नेशने देखील पुन्हा उत्तर दिले आहे.
मात्र विग्नेशच्या या उत्तरामध्ये त्याने चित्रपटाबाबत महत्त्वाची गोष्ट (Jawan New Update) शेअर केली आहे.

 

विग्नेशने शाहरुखच्या ट्वीटला रिप्लाय देत लिहिले आहे की, “तुम्ही खूप चांगले आहात सर,
आणि मी आता काळजी घेत आहे. पण मी असे ऐकले आहे की चित्रपटात तुम्हा दोघांमध्ये चांगला रोमान्स आहे,
हे तिला रोमांसच्या किंग कडून शिकायला मिळाले आहे. त्यामुळे आधीच आनंदाने चियरिंग करत आहे तिच्या स्वप्नातील या तुमच्यासोबत पदार्पणमुळे” विग्नेशच्या या ट्विटमुळे जवान चित्रपटामध्ये शाहरुख व नयनतारा यांचा रोमांस बघायला मिळणार असल्याचे जाहीर झाले आहे.

 

शाहरुखच्या चाहत्यांमध्ये त्याच्या आगामी ‘जवान’ चित्रपटाबाबत खूप उत्सुकता आहे.
त्याचे चाहते चित्रपटाची आतुरतेने प्रतिक्षा करत आहेत. त्यांना आता ‘जवान’(Jawan) चित्रपटामध्ये शाहरुखचा नयनतारा सोबत रोमांस बघायला मिळणार आहे. ‘जवान’ चित्रपटामध्ये शाहरुख व नयनतारा सोबतच विजय सेतुपति (Vijay Sethupathi), दाक्षिणात्य अभिनेता विजय (Actor Vijay) यांची प्रमुख भूमिका असणार आहे. यामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) पाहुणी कलाकार म्हणून झळकणार आहे. (Jawan Release Date) बहुचर्चित जवान चित्रपट येत्या 7 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 

Web Title : Jawan Movie | nayanthara husband vignesh shivan reveals shah rukh khan movie jawan spoiler

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा